अक्षय कुमारने घेतले यूएई मधील पहिल्या हिंदू मंदिराचे दर्शन, व्हिडीओ व्हायरल

Akshay Kumar visits Abu Dhabi First Hindu Temple: संयुक्त अरब अमीरात (यूएई) च्या अबुधाबी मध्ये पहिले हिंदू मंदिर बांधून झाले आहे. BAPS द्वारा निर्मित हे हिंदू मंदिर खूपच भव्य आणि विशाल आहे. जायचे उद्घाटन पीएम मोदी यांनी नुकतेच केले. अबुधाबी मध्ये बनलेले हे पहिले हिंदू मंदिर भगवान स्वामीनारायण यांना समर्पित आहे. स्वामीनारायण मंदिर देशाच्या आणि जगाच्या अनेक भागांमध्ये बनले आहे. पण अबुधाबी मध्ये भगवान स्वामीनारायणांना स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशा स्थितीमध्ये देशवासीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. उद्घाटनानंतर आता लोक दर्शनासाठी तिथे येऊ लागले आहेत. दरम्यान बुधवारी अक्षय कुमार (Akshay Kumar) देखील अबुधाबी मधील पहिल्या हिंदी मंदिरामध्ये जाऊन आशीर्वाद घेतले. त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

पहा व्हिडीओ

Akshay Kumar
Akshay Kumar

News Title: akshay kumar visits abu dhabi first hindu temple