लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी अथिया शेट्टी-केएल राहुलने दाखवली लग्नाच्या न पाहिलेल्या क्षणांची झलक, सुनील शेट्टीने दिली क्युट प्रतिक्रिया

Athiya Shetty and KL Rahul Wedding Anniversary: बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुलने नुकतेच त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी कपलने एक रोमँटिक व्हिडिओ (Athiya Shetty and KL Rahul Wedding Anniversary Video) देखील शेअर केला, ज्यामुळे त्यांनी आपल्या ड्रीम वेडिंगच्या अविस्मरणीय क्षणांची झलक दाखवली. जी अजूनपर्यंत कोणी पाहिली नव्हती. या व्हिडीओवर चाहतेच नाही तर कुटुंबीय आणि मित्र देखील भरभरून प्रेम दाखवत आहेत.

Athiya Shetty and KL Rahul Wedding Anniversary

इंस्टाग्रामवर शेयर केला व्हिडीओ (Athiya Shetty and KL Rahul Wedding Anniversary)

केएल राहुल आणि अथिया शेट्टीने एक इंस्टाग्राम पोस्ट शेयर केली आहे. व्हिडीओ शेयर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, “तुला शोधणे हे घरी येण्यासारखे होते.” व्हिडीओबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी आपल्या एंगेजमेंट रिंग्स दाखवत रोमँटिक पोज दिल्या आहेत. यानंतर लग्नाच्या काही न पाहिलेल्या क्षणांची झलक पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये वधूच्या एन्ट्रीपासून ते वराच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. यानंतर अथिया आणि केएल राहुल एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. तर हळदी आणि संगीत सेरेमनीमधील मौजमजेच्या सुंदर क्षणांची झलक देखील समोर आली आहे.

या व्हिडीओच्या कमेंटमध्ये चाहते आणि कपलचे कुटुंबीय आणि मित्रांनी हार्ट इमोजीची पाऊस पडला आहे. तर वडील सुनील शेट्टी ने देखील हार्ट इमोजीने कापला आपली क्युट प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय सुनील शेट्टीने केएल राहुल आणि अथिया चा एक फोटो शेयर करत लिहिले आहे कि, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर अथिया ने कमेंटमध्ये  “लव यू पापा” असे लिहिले आहे. केएल राहुल आणि अथिया शेट्टी ने गेल्या वर्षी 23 जानेवारी रोजी सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्महाऊसवर लग्न केले होते. ज्यामध्ये डायना पेंटी, कृष्णा श्रॉफ, अंशुला कपूर, अनुष्का रंजन, आदित्य सील, क्रिकेटर वरुण आरोन आणि ईशांत शर्मा सामील झाले होते.