नवी इलेक्ट्रिक SUV देशात दाखल, सिंगल चार्जमध्ये धावते ६३५ किमी, पण किंमत तर…

BMW iX xDrive50 Launch: लक्झरी कारसाठी ग्राहकांचे वाढते प्रेम आणि आकर्षण बघून लक्झरी कार उत्पादक BMW कंपनी भारतीय बाजारपेठेत आपल्या नव्या नव्या कार देशात लाँच करत असते. या कंपनीच्या कार महागड्या असल्या तरी खूप पसंत केल्या जातात. कोट्यवधींच्या घरात किंमत असणाऱ्या या कार त्यांच्या आकर्षक डिझाईन, लुक फिचर्समुळे ग्राहकांच्या पसंतीस पडत असतात. आता पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत BMW ने मोठा धमाका केला आहे.

BMW ने iX xDrive50 चे नवीन हाय स्पेक व्हेरियंट भारतात लाँच केले आहे. या टॉप व्हेरियंटमध्ये मोठी बॅटरी देण्यात आली आहे. त्यात आणखी रेंजही मिळणार आहे. याशिवाय येथे शक्तिशाली मोटर्सही देण्यात आल्या आहेत. iX xDrive40 च्या तुलनेत, आतील आणि बाहेरील भागात किरकोळ बदल करण्यात आले आहेत. xDrive40 च्या तुलनेत, xDrive50 १९ लाख रुपयांनी महाग आहे. Read More…