Big Boss 17: बिग बॉस 17 मधून ‘हा’ सदस्य झाला बेघर, नाव ऐकताच दर्शकांना झाला आनंद

Big Boss 17: बिग बॉस 17 महाअंतिम सोहळा आता काही दिवसच दूर आहे, ज्यामुळे शोमध्ये सध्या फॅमिली वीक सुरू आहे. पण आता विकेंड वार आला आहे, ज्यामध्ये इव्हिकशनबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे, ज्यामुळे चाहते खूपच खुश झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दर्शक या कंटेस्टेंटच्या शोमधून बाहेर जाण्याची वाट पाहत होते. आता असे झाल्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे.

द खबरीने शेयर केली पोस्ट (Big Boss 17)

द खबरीनुसार या आठवड्यामध्ये समर्थ जुरेल म्हणजेच चिंटू शोमधून बाहेर झाला आहे, ज्यामुळे चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे. वास्तविक या आठवड्यामध्ये अरुण मशेट्टी, मन्नारा चोप्रा, आयशा खान, विकी जैन, अभिषेक कुमार आणि मुनव्वर फारूकी शोमध्ये नॉमिनेट झाले होते. तर रिपोर्टचा दावा आहे कि बिग बॉस 17 (Big Boss 17) मध्ये आलेल्या फॅमिली मेंबर्सजवळ पॉवर असेल कि ते नॉमिनेटेड कंटेस्टेंटमधील कोणा एकाला एलिमनेट करू शकतील.

काहीही असो आता समर्थ जुरेलच्या इविक्शनमुळे चाहते खूपच खुश झाले आहेत. एका युजरने लिहिले आहे कि, हि आतापर्यंतची सर्वात बेस्ट न्यूज आहे. तर दुसऱ्या एका युजरने बेस्ट न्यूज, आता आम्ही खुश आहे असे लिहिले आहे. तिसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि आता ईशा मालवीय काय करेल हे पाहावे लागेल. खासकरून कुमारसोबत. चौथ्या युजरने लिहिले आहे कि मुनव्वर फारूकीला झिरो म्हणत होता. आयशा इतके देखील मते मिळाली नाहीत.

गेल्या आठवड्यामध्ये अभिषेक कुमारचे समर्थ जुरेल आणि ईशा मालवीय सोबत भांडण झाले होते, ज्यामुळे अभिषेक शोमधून बाहेर झाला होता. वास्तविक अभिषेकला चिडवल्यानंतर त्याने समर्थ जुरेलवर हात उचलला होता. पण विकेंड वारमध्ये तो घरच्यांचा संमतीनंतर शोमध्ये परत आला होता.

हेही वाचा: आयशा खानने मुनव्वर फारुकीवर केला गंभीर आरोप, म्हणाली; ‘एकाच वेळी दोन मुलींसोबत’