Devara Teaser Out : ‘देवरा’चा टीझर आऊट, ज्युनिअर एनटीआरचा दबंग अंदाज पाहून अंगावर शहरे येतील, पहा व्हिडीओ

Devara Teaser Out : साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर सध्या त्याच्या अपकमिंग देवरा चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये खूपच क्रेज पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये एनटीआर जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. चित्रपटाबद्दल दर्शकांची उत्सुकता खूपच वाढली आहे. दरम्यान चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढवण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला टीझर आऊट केला आहे.

Devara Teaser Out – ‘देवरा’ टीझर आऊट

टी-सीरिज च्या युट्युब चॅनलवरून देवरा पार्ट 1 (Devara Teaser Out) चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये ज्युनिअर एनटीआरच्या भूमिकेची झलक पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या शेवटी अभिनेता असे म्हणताना ऐकू येते कि या समुद्राने माशांपेक्षा रक्त आणि खंजीर जास्त पाहिले आहेत, कदाचित म्हणूनच याला लाल समुद्र म्हणतात.

व्हिडीओमध्ये अभिनेता जबरदस्त अ‍ॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे, जे पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्कंठा आणखीनच वाढली आहे. चित्रपटाची पहिली झलक पाहिल्यानंतर कोणाच्या अंगावर शहरे येऊ शकतात. आता हि झलक पाहिल्यानंतर दर्शकांना आता टीझर आणि ट्रेलरची आतुरता लागली आहे.

जान्हवी कपूर देखील मुख्य भूमिकेत

देवरा चित्रपटा पॅन इंडिया अ‍ॅक्शन ड्रामा आहे. यामध्ये ज्युनिअर एनटीआरची जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. चित्रपट दोन भागामध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये ज्युनिअर एनटीआर सोबत जान्हवी कपूर देखील मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. शिवाय सैफ अली खान देखील मुख्य भूमिकेमध्ये आहे. त्याचबरोबर श्रीकांत मेका, टॉम शाइन चाको, नारायण देखील चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत.

या दिवशी रिलीज होणार चित्रपटाचा पहिला पार्ट

या पॅन इंडिया चित्रपटाचा (Devara) पहिला भाग या वर्षी ४ एप्रिल रोजी तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. चित्रपटाला नंदामुरी कल्याण राम द्वारा प्रस्तुत केले गेले आहे. तर याला एनटीआर आर्ट्स आणि युवासुधा आर्ट्स बॅनरखाली नियंत्रित केले गेले आहे. हा चित्रपट मिकिलिनेनी सुधाकर आणि हरि कृष्ण यांची निर्मिती आहे.

हेही वाचा: ममूटी आणि ज्योतिकाचा ‘काथल’ ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज, वाचा चित्रपटासंबंधित डिटेल