धर्मेंद्र यांची लेक ईशा देओलचा 11 वर्षाचा संसार उध्वस्त!, परस्त्रीसाठी पतीने केली ईशा देओलची फसवणूक

हेमा मालिनी आणि धर्मेंद्रची मुलगी ईशा देओल तिच्या वैवाहिक आयुष्यामध्ये सध्या खूप चर्चेमध्ये आहे. असे म्हंटले जात आहे कि ईशा आणि तिचा पती भरत तख्तानी (Esha Deol Divorce) एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. ईशा आणि भरतला फिल्म इंडस्ट्री स्ट्रॉन्ग कपल म्हणून पाहिले जात होते. दोघे सोशल मिडियावर नेहमी फोटोज शेयर करत असत आणि इवेंट्स मध्ये देखील एकत्र पाहायला मिळत असत. पण गेल्या काही दिवसांपासूनचे चित्र वेगळे आहे. अशामध्ये चाहत्यांनी असा अंदाज व्यक्त करायला सुरुवात केली आहे कि दोघे वेगळे झाले आहेत.