सोनं झालं स्वस्त…! खरेदी पूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा दर

Gold Rate Today Pune: वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या-चांदीच्या बाबतीत आनंदवार्ता मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळत होती ज्याला आता ब्रेक लागला आहे. वर्षाच्या सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या दरात (Gold Rate Today Pune) तेजी होती. पण आता सोन्याच्या भाव घसरला आहे. डिसेंबर 2023 मध्ये सोन्या-चाडीच्या दराने उच्चांक गाठला होता. हा रेकॉर्ड वर्षाच्या सुरुवातीला मोडीत निघेल अशी शंका होती. पण सोन्याचा भाव घसरला आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

सोन्या-चांदीचा भाव घसरला (Gold Rate Today Pune)

डिसेंबरच्या अखेरीस सोन्याचा भाव 700 रुपयांनी वाढला होता. तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचा भाव वाढतच होता. 2 जानेवारी 2024 रोजी सोनं 270 रुपयांनी वाढलं होतं. तर 3 जानेवारी रोजी सोन्याचा भाव 270 रुपयांनी घसरला. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 56,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 63,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर एक किलो चांदीचा भाव 78,600 रुपये आहे.

तुमच्या शहरामध्ये सोन्याचा भाव (Gold Rate Today)

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, तुमच्या शहरातील सोन्याचा भाव खालीलप्रमाणे आहे.
  • मुंबईत 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 57,603 रुपये आहे, तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 63,840 रुपये इतका आहे. (Gold Rate Today Mumbai)
  • पुण्या मध्ये 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 57,603 रुपये आहे, तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 62,840 रुपये इतका आहे. (Gold Rate Today Pune)
  • नागपूर मध्ये 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 57,603 रुपये आहे, तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 62,840 रुपये इतका आहे. (Gold Rate Today Nagpur)
  • नाशिक मध्ये 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 57,603 रुपये आहे, तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 62,840 रुपये इतका आहे. (Gold Rate Today Nashik)
  • कोल्हापूर मध्ये 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 57,603 रुपये आहे. कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 62,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Gold Rate Today Kolhapur)