Hyundai Creta Facelift चे बुकिंग सुरु, अवघ्या ‘इतक्या’ रुपयांमध्ये बुक करा तुमची ड्रीम कार

Hyundai Creta Facelift Booking Open: हुंडाई मोटर्सने आपल्या हुंडाई क्रेटा फेसलिफ्टचे बुकिंग अधिकृतपणे भारतीय मार्केटमध्ये सुरु केले आहे. हुंडाई क्रेटा भारतीय मार्केटमध्ये कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी SUV आहे. नवीन जनरेशन हुंडाईचे 16 जानेवारी 2024 रोजी भारतीय मार्केटमध्ये अनावरण केले जाणार आहे. यासोबतच कंपनीने याच्या इंटीरियर आणि एक्सटीरियरबद्दल नवीन माहिती दिली आहे.

Hyundai Creta Facelift Booking

नवीन जनरेशन हुंडाई क्रेटा फेसलिफ्ट चे बुकिंग तुम्ही ऑनलाइन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून करू शकता. यासाठी तुम्हाला 25000 रुपये टोकन रक्कम भरावी लागेल. शिवाय बुकिंगसाठी तुम्ही जवळच्या डीलरशिप सोबत संपर्क देखील करू शकता. 2024 च्या जूनपर्यंत या कारची डिलिव्हरी सुरु होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Hyundai Creta Facelift

Hyundai Creta Facelift Varient and Colours

खाली दिलेल्या टेबलमध्ये हुंडाई क्रेटाच्या व्हेरिएंट आणि कलर ऑप्शनबद्दल अधिक माहिती दिली आहे.

VariantColor Options
ERobust Emerald Pearl, Fiery Red, Ranger Khaki, Abyss Black, Atlas White, Titan Grey, Atlas White with Black Roof (Dual-tone)
EXRobust Emerald Pearl, Fiery Red, Ranger Khaki, Abyss Black, Atlas White, Titan Grey, Atlas White with Black Roof (Dual-tone)
SRobust Emerald Pearl, Fiery Red, Ranger Khaki, Abyss Black, Atlas White, Titan Grey, Atlas White with Black Roof (Dual-tone)
S(O)Robust Emerald Pearl, Fiery Red, Ranger Khaki, Abyss Black, Atlas White, Titan Grey, Atlas White with Black Roof (Dual-tone)
SXRobust Emerald Pearl, Fiery Red, Ranger Khaki, Abyss Black, Atlas White, Titan Grey, Atlas White with Black Roof (Dual-tone)
SX TechRobust Emerald Pearl, Fiery Red, Ranger Khaki, Abyss Black, Atlas White, Titan Grey, Atlas White with Black Roof (Dual-tone)
SX(O)Robust Emerald Pearl, Fiery Red, Ranger Khaki, Abyss Black, Atlas White, Titan Grey, Atlas White with Black Roof (Dual-tone)

Hyundai Creta Facelift

नवीन जनरेशन हुंडाई क्रेटा फेसलिफ्ट मध्ये समोरच्या बाजूला नवीन डिझाईन केले गेलेल्या फ्रंट प्रोफाइल सोबत नवीन कनेक्ट एलइडी डीआरएल लाइट यूनिट सोबत एक उत्तम पॅटर्न सोबत बोल्ड लुक मिळती. तथापि कारच्या आकारामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, पण हि कार नवीन डिझाईन केल्या गेलेल्या ड्यूल टोन डायमंड कट अलॉय व्हीलसह सादर केले जाईल.

Hyundai Creta Facelift

मागील बाजूस देखील आपल्याला नवीन बंपरसोबत नवीन कनेक्टेड LED टेल लाईट युनिटसोबत नवीन बंपर दिला जाणार आहे. हुंडाई क्रेटाच्या सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत नवीन जनरेशन हुंडाई क्रेटाची रोड प्रेझेन्स खूप जास्त असणार आहे.

Hyundai Creta Facelift Features list

बुकिंगसोबत कंपनीने कारच्या इंटीरियरची माहिती देखील शेअर केली आहे. यामध्ये नवीन डिझाईन केलेले डॅशबोर्ड लेआउट आणि सेंटर कन्सोलसह आकर्षक प्रीमियम इंटीरियर मिळते. या कारचे इंटीरियर जुन्या जनरेशनच्या तुलनेमध्ये खूप जास्त अडव्हांस बनवले गेले आहे. यामध्ये एक वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह मोठा कनेक्टेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले असेल.

Hyundai Creta Facelift

शिवाय 60 डिग्री कॅमेरा, समोरील बाजूस हाइट एडजेस्टेबल ड्राइवर सीट सोबत हवेदार सीट, एक मोठा पॅनोरामिक सनरूफ, अनेक कलर ऑप्शंस सोबत एंबिएंट लाइटिंग, वायरलेस मोबाइल चार्जिंग , ड्यूल जॉन क्लाइमेट कंट्रोल आणि मागच्या प्रवाश्यांसाठी खास AC वेंट्स दिला गेला आहे.

Hyundai Creta Safety features

सेफ्टी फीचर्समध्ये नवीन जनरेशन हुंडाई क्रेटाला दोन लेवल ADAS टेक्निकसोबत संचालित केले गेले आहे. ADAS टेक्निकमध्ये समोर आणि मागील बाजूस टक्कर टाळणे, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टम, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन कीपिंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, ड्रायव्हर अटेन्शन अलर्ट, रीअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, ट्रॅफिक जॅम असिस्ट, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि बरेच फीचर्स सामील आहेत.

शिवाय असा अंदाज लावला जात आहे कि यामध्ये 7 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, हिल हॉल एसिस्ट, हिल डीसेंट कंट्रोल, ट्रेक्शन कंट्रोल मिळणार आहे.

Hyundai Creta Engine

बोनेटच्या खाली किया सेल्टोस सारखे तीन इंजिन ऑप्शंस सोबत संचालित केले जाणार आहे. 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, 1.5 लिटर डिझेल इंजिन आणि 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन. सर इंजिन ऑप्शंस ला सहा-स्पीड मॅन्युअल स्टँडर्ड पणे आणि सिक्स स्पीड आईबीटी, सिक्स स्पीड ऑटोमेटिक आणि पाच-स्पीड DCT गियर बॉक्स मिळणार आहे.

Hyundai Creta Price in India

आगामी हुंडाई क्रेटाची भारतीय मार्केटमध्ये जवळ जवळ 11 लाख रुपयांपासून ते 18 लाख रुपयांपर्यंत शोरूम प्राईस असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: New Suzuki Swift Sportier: जानेवारीमध्ये लाँच होणार ‘हि’ नवीन स्विफ्ट, लाँचिंगच्या अगोदर जाणून घ्या काय-काय असणार खास