Kia ने लाँच केली आपली छोटी इलेक्ट्रिक कार, 200 किमीची रेंज आणि फक्त 40 मिनिटांमध्ये फुल चार्ज

Kia Ray EV: नुकतेच किया मोटर्सकडून Kia Ray EV ची लाँचिंग केली गेली आहे जी एक साऊथ कोरियाई कंपनी आहे. हि कार टाटा नॅनोपेक्षा लहान आणि मारुती अल्टोपेक्षा स्वस्त आहे. त्याचबरोबर हि कार आपल्या कॉम्पॅक्ट साईज आणि उत्कृष्ट डिझाईनसाठी प्रसिद्ध आहे. 2023 च्या ऑगस्ट मध्ये कंपनीकडून या कारला ग्लोबल मार्केटमध्ये सादर करण्यात आले होते आणि हि कार आता भारतामध्ये देखील उपलब्ध आहे. यासोबतच किया मोटर्सने किआ रे ईवी मध्ये अनेक महत्त्वाचे अपडेट्स केले आहेत.

Kia Ray EV चे फीचर्स

कंपनीकडून Kia Ray EV इलेक्ट्रिक कार मध्ये 6 कलर ऑप्शन दिले गेले आहेत, ज्यामध्ये नवीन स्मोक ब्लू कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. तर या इलेक्ट्रिक कारचे इंटीरियर लाइट ग्रे आणि ब्लॅक आहे. याच्या केबिनमध्ये 10.25 इंचाचा इंस्ट्रूमेंट क्लस्टर पाहायला मिळतो आणि यासोबतच कॉलम-स्टाइल इलेक्ट्रॉनिक शिफ्ट लीवर आणि फ्लॅट-फोल्डिंग सीट यासारखे फीचर्स देखील आहेत. वास्तविक कारच्या केबिनमध्ये स्पेस वाढवण्यासाठी फ्लॅट फोल्डिंग सीटचा वापर केला आहे.

बॅटरी आणि मोटर कॅपेसिटी

Kia कडून लाँच झालेल्या Kia Ray EV 32.2 KWh क्षमता असलेली लिथियम फेरोफॉस्फेट बॅटरी पॅकने सुसज्ज आहे. या इलेक्ट्रिक कार मध्ये 64.3 kW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर आहे. जी 86 HP चा पॉवर आउटपुट आणि 147 Nm टॉर्क प्रदान करते. हि कार सिंगल चार्जमध्ये 205 किलोमीटर पर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते. तर सिटी कंडीशनमध्ये हि रेंज 233 किलोमीटर पर्यंत वाढते.

चार्जिंगला खूप कमी वेळ

Kia Ray EV मध्ये 150 kW क्षमतेचा फास्ट चार्जर देण्यात आला आहे. याच्या मदतीने 10 ते 80 टक्के चार्ज करण्यासाठी 40 मिनिटाचा वेळ लागतो. याव्यतिरिक्त एक 7kW पोर्टेबल चार्जर देखील दिला जातो. तथापि या चार्जरमुळे बॅटरी थोडी हळू चार्ज होते. या पोर्टेबल चार्जरने कारची बॅटरी जवळ जवळ 6 तासांमध्ये फुल चार्ज होते.

Kia Ray EV ची किंमत

साऊथ कोरियाई कंपनीने कारचे उत्पादन करताना याच्या डिझाईनला अर्बन ड्रायव्हिंगवर जास्त लक्ष दिले आहे. किआ रे ईवी कारची डिझाईन याच्या पेट्रोल मॉडेलसारखीच आहे. हि कार अशा लोकांना लक्षात घेऊन बनवली आहे ज्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये एंट्री लेवल मिनी इलेक्ट्रिक कार खरेदी करायची आहे. त्याचबरोबर अशा कार्स लोकांना खूप आवडतात. या मिनी इलेक्ट्रिक कार ची किंमत साऊथ कोरियामध्ये जवळ जवळ 17.27 लाख रुपये आहे. Kia Ray EV बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

हेही वाचा: Seven-Seater Maruti Car लवकरच होणार लाँच, जाणून घ्या संपूर्ण फीचर्स आणि किंमत