Maharaja Express: ट्रेनमध्ये प्रवास करायला प्रत्येकाला आवडते, पण तुम्ही कधी भारतातील सर्वात महागड्या ट्रेनमधून प्रवास करण्याचा विचार केला आहे का. असो हे बजेटच्या दृष्टीनेही अवघड आहे. पण आज आपण तुम्हाला फोटोंचा माध्यमातून या ट्रेनच्या आत्मध्ले फोटो दाखवणार आहोत.
आम्ही इथे बोलत आहोत भारतामधील सर्वात महागड्या ट्रेनबद्दल, (Maharaja Express) या ट्रेनमध्ये अशा सुविधा आहेत ज्या तुम्हाला फाईव स्टार हॉटेलमध्ये देखील मिळणार नाहीत. ट्रेनमध्ये प्रवेश करताच तुम्हाला अशी जाणीव होईल कि तुम्ही सर्वोत्तम हॉटेलमधील सुविधा देखील विसरून जाल आणि तुम्हाला असे वाटेल कि तुम्ही जगातील सर्वात आलिशान हॉटेलमध्ये आला आहात.
Maharaja Express ट्रेन
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) द्वारे चालवली जाणारी महाराजा एक्सप्रेस ट्रेन भारतातील सर्वात महागड्या ट्रेनमध्ये गणली जाते. हि ट्रेन ७ दिवस चार वेगवेगळ्या रूटवर प्रवास करते ज्यामध्ये द इंडियन पॅनोरमा’, ‘ट्रेझर्स ऑफ इंडिया’, ‘द इंडियन स्प्लेंडर’ आणि ‘द हेरिटेज ऑफ इंडिया’ या मार्गांचा समावेश आहे.
विश्वास ठेवा ट्रेनच्या आतमधील नजरा पाहून तुमचे डोळे दिपतील. ट्रेनच्या आतमधील सिटींग रूम असो किंवा बेडरूम सर्व काही रॉयल आहे. या ट्रेनमध्ये तुम्हाला राजेशाही व्यवस्था मिळते. या ट्रेनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टूर आणि केबिननुसार भाडे द्यावे लागते.
इंडियन पॅनोरमा पॅकेजच्या डिलक्स केबिनची किंमत ११ लाखांपासून (maharaja express ticket price) सुरू होते, तर या टूरच्या प्रेसिडेंशियल सूटची किंमत सुमारे ४० लाख आहे. यावरून या ट्रेनचा प्रवास किती महाग आहे याची कल्पना येऊ शकते.