Moto G34 5G Launch: मोटोरोलाने लाँच केला सर्वात स्वस्त बजट 5G स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Moto G34 5G Launch: मोटोरोलाने मंगळवारी (9 जानेवारी) रोजी भारतामध्ये आपला नवीन बजट 5G स्मार्टफोन Moto G34 5G लाँच केला आहे. 2024 मध्ये मोटोरोलाचे भारतातील हे पहिली प्रोडक्ट आहे आणि यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट सोबत होल-पंच डिस्प्ले दिला आहे. Moto G34 5G मध्ये Snapdragon 695 चिपसेट, 8GB RAM आणि 128GB स्टोरेज दिले गेले आहे.

फोनच्या मागे 50-मेगापिक्सेल मुख्य सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देखील दिली आहे. या स्मार्टफोनला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लाँच केले गेले होते. चला तर जाणून घेऊया Moto G34 5G ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

Moto G34 5G किंमत

Moto G34 5G दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. पण एक्सचेंज ऑफरमध्ये हा स्मार्टफोन 9,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे, पण एक्सचेंज ऑफरनंतर ते 10,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. हा स्मार्टफोन चारकोल ब्लॅक, आइस ब्लू आणि ओशन ग्रीन या तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ग्रीन व्हेरिएंटमध्ये मागच्या बाजूला सुंदर वीगन लेदर फिनिश आहे.

Moto G34 5G स्पेसिफिकेशन्स

Moto G34 5G मध्ये दोन नॅनो सिम कार्ड्स बसू शकतात आणि हा लेटेस्ट अँड्रॉयड 14 सोबत येतो. कंपनीने यासाठी पुढचे अपडेट अँड्रॉयड 15 आणि तीन वर्षांसाठी सिक्युरिटी पॅच देण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये मोठा 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 720×1,600 पिक्सेल आहे.

हा फोन स्मूथ एक्सपीरियंस साठी 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. डिस्प्लेमध्ये वरच्या बाजूला छोटा कॅमेरा होल आहे आणि हा फुटण्यासाठी वाचण्य्साठी पांडा ग्लास लेयर लावली आहे. यामध्ये आठ-कोर स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर आणि 8GB रॅम आहे. फ्री स्टोरेज वापर करून रॅम आपल्या आवश्यकतेनुसार 16GB पर्यंत RAM वाढवता येते.

Moto G34 5G कॅमेरा

मोटो G34 5G मधील कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये मागील बाजूस दोन कॅमेरे आहेत. पहिला कॅमेरा 50 मेगापिक्सल चा आहे तर दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल्सचा आहे. दोन्ही कॅमेऱ्यांसोबत एलईडी फ्लॅश देखील आहे. यामध्ये आणि व्हिडिओ कॉलसाठी 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 128GB स्टोरेज आहे, जे तुम्ही 1TB पर्यंत वाढवू शकता.

Moto G34 5G

इतर फीचर्स

कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Wi-Fi, ब्लूटूथ, FM रेडिओ, GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB Type-C पोर्ट देण्यात आली आहे. सिक्युरिटीसाठी साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक देखील यामध्ये आहे. तर एक्सेलेरोमीटर, अॅम्बियंट लाइट, जायरोस्कोप, एसएआर सेन्सर, सेन्सर हब, ई-कंपास आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देण्यात आले आहेत. तर फोन ला डुअल स्टीरियो स्पीकर आहे जो डॉल्बी एटमॉस सह येतो.

मोटो G34 5G बॅटरी

या फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी आहे, जी दीर्घकाळ टिकते. यामध्ये 20W टर्बोपॉवर चार्जिंग देखील आहे, ज्यामुळे तुम्ही फोन लवकरच चार्ज करू शकता. फोनची साईज 162.7×74.6x8mm आणि वजन 179 ग्रॅम आहे. तर लेदर व्हेरिएंटचे वजन 181 ग्रॅम आहे.