नोरा फतेहीचा बोल्ड लुक पाहून चाहत्यांना थंडीमध्ये फुटला घाम, नोरा फतेहीचा बोल्ड व्हिडीओ व्हायरल

Nora Fatehi Bold Video: बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्री आपल्या डांसमुळे तिच्या करियरमध्ये खूपच प्रसिद्ध झाली. 2018 मध्ये तिने ब्लॉकबस्टर म्युझिक व्हिडीओ दिलबरमध्ये काम केले होते. ज्याला युट्युबवर एक बिलियनपेक्षा अधिक वेळा पाहिले गेले आणि यावरून तिला तिची क्षमता दाखवण्याच्या अनेक संधी मिळाल्या.

नोरा गेल्या काही वर्षांमध्ये अनेक हॉलीवूड चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे. ज्यामध्ये भारत, स्त्री, बाटला हाउस, रोर आणि सत्यमेव जयते चित्रपट सामील आहेत. अभिनेत्री आणि डांसर नोरा फतेहीने (Nora Fatehi) झलक दिखला जा 10 मध्ये जज म्हणून देखील कम केले आहे. ती नेहमी आपल्या स्टायलिश आणि मदहोश करणाऱ्या लुकने सर्वांना चकित करत असते. अशामध्येच तिचा आणखी एक नवीन लुक सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्याने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

व्हिडीओ व्हायरल (Nora Fatehi Bold Video)

गुरुवारी फिल्म सिटी मुंबईमध्ये नोरा फतेहीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्री भडक सिल्वर रागाच्या फिट्ट ड्रेसमध्ये व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडताना दिसत आहे. इतक्या फिट्ट ड्रेसमध्ये तिची कर्वी फिगर स्पष्टपणे पाहायला मिळते आहे. पॅप्ससमोर नोराने आपल्या कर्वी फिगरमध्ये अनेक किलर पोज दिल्या.

आज बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध डांसर म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नोरा फतेहीने आपल्या जबरदस्त कामगिरीने आणि अभिनय कौशल्याने एक जागतिक ओळख निर्माण केली आहे आणि आपले एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. अभिनेत्रीला सोशल मिडियावर करोडो लोक फॉलो करतात. इवेंट्स आणि चित्रपटामध्ये काम करण्याशिवाय नोरा डांस रियालिटी शोमध्ये देखील जज राहिली आहे.

वर्कफ्रंट

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नोरा फतेही विद्युत जामवालसोबत (Vidyut Jammwal) क्रॅक चित्रपटामध्ये स्क्रीन शेयर करताना दिसणार आहे. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला तिने एक भावूक नोट शेयर करून घोषणा केली होती कि तिने चित्रपटाचे शुटींग पूर्ण केले आहे.