Pradhan Mantri Suryoday Yojana: फक्त ‘याच’ लोकांना मिळणार सोलर योजनेचे फायदा, वीजबिलामधून होणार सुटका

Pradhan Mantri Suryoday Yojana: केंद्र सरकारकडून लोकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केली आहे. पीएम मोदी यांनी अयोध्यामध्ये राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमानंतर प्रधानमंत्री सूर्योदय योजना ची (Pradhan Mantri Suryoday Yojana) घोषणा केली. ज्या अंतर्गत देशातील 1 कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा पॅनेल बसवण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री यांनी या यासंदर्भात एका बैठकीचे अध्यक्षपद देखील भूषवले. आज आपण जाणून घेणार आहोत कि या योजनेचा फायदा कोणत्या लोकांना मिळणार आहे आणि याचे नियम काय आहेत.

Pradhan Mantri Suryoday Yojana

पीएम मोदींनी दिली माहिती – Pradhan Mantri Suryoday Yojana

प्रधानमंत्री सूर्योदय योजना ची घोषणा केल्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या एक्स हँडल वरून पोस्ट करत लिहिले कि, “सूर्यवंशी भगवान श्री राम यांच्याकडून जगातील सर्व भक्तगण उर्जा प्राप्त करतात. आज अयोध्यामध्ये प्राण-प्रतिष्ठा च्या शुभ प्रसंगी माझा हा संकल्प आहे कि प्रत्येक भारतीयाच्या घराच्या छतावर त्यांचे स्वतचे सोलर रूफ टॉप सिस्टम असेल.

अयोध्यावरून परतल्यानंतर मी पहिला निर्णय हा घेतला आहे कि आमचे सरकार 1 करोड घरांवर रूफटॉप सोलर लावण्याच्या उद्दिष्टाने प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरु करेल. यामुळे गरीब आणि मध्यम वर्गातील लोकांना वीज बिल तर कमी येईलच त्याचबरोबर भारत उर्जा क्षेत्रामध्ये स्वावलंबी देखील बनेल.

योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

प्रधानमंत्री सूर्योदय योजना (Pradhan Mantri Suryoday Yojana) देशातील गरीब आणि मध्यम वर्गातीळ लोकांसाठी सुरु करण्यात येणार आहे. दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या लोकांना या योजने अंतर्गत आणले जाणार आहे. सध्या सरकार कडून याबद्दल कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली नसून, पण असे म्हंटले जात आहे कि ज्या कुटुंबांचे उत्पन्न 2 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सोलर पॅनल बसवल्यानंतर वीजबिलाच्या टेंशनमधून लोकांची सुटका होणार आहे. या योजनेचा सर्वात जास्त फायदा त्या राज्यांमधील लोकांना होणार आहे जिथे वीज खूप महाग आहे.