वयाच्या 33 व्या वर्षी रकुल प्रीत सिंह अडकणार विवाहबंधनात, ‘या’ दिवशी घेणार सात फेरे

Rakul Preet Singh Jackky Bhagnani Wedding Date: 2024 मध्ये अनेक बॉलीवूड सेलेब्स विवाह बंधनात अडकणार आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आमिर खानची मुलगी इरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत सात फेरे घेणार आहे तर आता आणखी एक कपल या वर्षी लग्न करणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. हि जोडी दुसरी तिसरी कोणती नसून रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी (Rakul Preet Singh Jackky Bhagnani Wedding) आहे. रिपोर्ट्सनुसार रकुल आणि जॅकी लवकरच वेडिंग डेट जहीर करणार आहेत.

Rakul Preet Singh Jackky Bhagnani Wedding

रकुल आणि जॅकीच्या वेडिंग डेटचा खुलासा (Rakul Preet Singh Jackky Bhagnani Wedding )

वास्तविक एका रिपोर्टनुसार रकुल आणि जॅकी फेब्रुवारीमध्ये गोव्यामध्ये (Rakul Preet Singh Jackky Bhagnani Wedding ) लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. रकुल आणि जॅकी 22 फेब्रुवारीला गोव्यात लग्न करणार आहेत. दोघे यामुळे गप्प आहेत कारण त्यांना खूपच इंटीमेट प्रकारे लग्न करायचे आहे.,

लग्नाच्या अगोदर व्हेकेशन एंजॉय

माहितीनुसार त्यांचे म्हणणे आहे कि ते प्राईव्हेट कपल आहे आणि त्यांचे लग्न देखील प्रायव्हेट ठेवायचे आहे. कपल लग्नसमारंभात व्यस्त होण्यापूर्वी व्हेकेशन एंजॉय करत आहेत रिपोर्टनुसार जॅकी सध्या बँकॉक (थायलंड) मध्ये तिच्या बॅचलर पार्टीचा आनंद घेत आहे. तर रकुल देखील थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

रकुल आणि जॅकीच्या वेडिंग डेटच्या अफवा

असे पहिल्यादाच झालेले नाही कि रकुल आणि जॅकीच्या लग्नाच्या (Rakul Preet Singh Jackky Bhagnani Wedding) तारखेबद्दल अफवा पसरली आहे. गेल्या वर्षी देखील सर्वांचे लक्ष त्यांच्यावर होते, पण नंतर अभिनेत्रीने या गोष्टीवर स्पष्ट नकार व्यक्त केला होता. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांची लव्ह लाईफही कोणापासून लपलेली नाही. हे कपल 2021 पासून एकमेकांना डेट करत आहे.

रकुल प्रीत सिंग वर्क फ्रंट

रकुल प्रीत सिंग च्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर ती कमल हसनच्या इंडियन 2 चित्रपटामध्ये दिसणार आहे. चित्रपटामध्ये बॉबी सिम्हा आणि प्रिया भवानी शंकर देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत. चित्रपटाचा प्रीक्वल 1996 मध्ये रिलीज झाला होता. यामध्ये कमल हसनने एका वृद्ध स्वतंत्रता सेनानीची भूमिका केली होती जो भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध करण्याचा निर्णय घेतो.

जॅकी भगनानी वर्क फ्रंट

जॅकी भगनानी च्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर तो त्याची पुढील निर्मिती असलेल्या बडे मियाँ छोटे मियाँ’च्या रिलीजमध्ये व्यस्त आहे. जफर द्वारा दिग्दर्शित, या चित्रपटात अक्षय, टायगर, सोनाक्षी सिन्हा आणि पृथ्वीराज सुकुमारन प्रमुख भूमिकेत आहेत आणि 2024 च्या ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: Ira Khan Wedding: आमिर खानची मुलगी इरा खान बनणार नुपूर शिखरेची नववधू, फोटो व्हायरल