Rashi Bhavishya Marathi: ज्योतिष शास्त्रामध्ये राहू-केतूला पापी आणि मायावी ग्रह म्हंटले गेले आहे. राहू-केतूच्या अशुभ प्रभावाची प्रत्येकाला भीती वाटते. पण असे नाही कि राहू-केतू फक्त अशुभ फळ देतात. राहू-केतू शुभ फळ देखील प्रदान करतात. जेव्हा राहू-केतू शुभ होतात तेव्हा व्यक्तीचे नशीब खूप उजळते.
राहू-केतूने 1 जानेवारी रोजी नक्षत्र परिवर्तन केले आहे. राहूने रेवती नक्षत्राच्या तिसऱ्या आणि केतूने चित्रा नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये प्रवेश केला आहे. राहू-केतू नेहमी वक्री चाल चालतात. राहू-केतूचे नक्षत्रा बदलतच काही राशींचे चान्वले दिवस सुरु होणार आहेत तर काही राशींना सावधान राहण्याची गरज आहे. चला तर जाणून घेऊया राहू-केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कोणत्या राशीवर काय परिणाम होती. (Rashi Bhavishya Marathi)
जाणून घ्या तुमचे Rashi Bhavishya
मेष राशी: मेष राशींच्या लोकांचे मन अस्वस्थ राहील. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. अतिरिक्त खर्च वाढू शकतो. तुमच्या मुलांकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायामध्ये जागरूक राहा.
वृषभ राशी: वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. पण मनामध्ये अस्वस्थता निराम होईल. कौटुंबिक जीवन कष्टमय राहील. तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये धावपळ जास्त करावी लागेल. व्यवसायामध्ये अडचणी येऊ शकतात.
मिथुन राशी: मिथुन राशीचे लोक आत्मविश्वासाने भरून राहतील. पण मनामध्ये एखादी शंका राहील. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. वडिलांचे सहकार्य लाभेल. व्यवसायामध्ये वाढ होईल.
कर्क राशी: कर्क राशीच्या लोकांनी संयम ठेवावा. रागावर नियंत्रण ठेवा. एखाद्या मित्राच्या मदतीने तुम्हाला व्यवसायाच्या संधी मिळू शकतात. अधिक परिश्रम करावे लागतील. लाभाच्या संधी निर्माण होतील.
सिंह राशी: सिंह राशीच्या लोकांच्या मनामध्ये चढ-उतार निर्माण होतील. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. दैनंदिन जीवनामध्ये अधिक धावपळ होऊ शकते. तुमचं व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला कुटुंबाकडून आर्थिक मदत मिळू शकते.
कन्या राशी: कन्या राशीच्या लोकांना नोकरीमध्ये बढतीच्या संधी मिळू शकतात. पण कार्यक्षेत्रामध्ये बदल होऊ शकतो. उत्पन्नामध्ये वाढ होईल. वाहन सुखामध्ये वृद्धी होऊ शकते. मित्रांचे सहकार्य मिळेल.
तूळ राशी: तूळ राशींच्या लोकांचे मन अशांत राहील. नोकरीमध्ये मोठ्या अधिकाऱ्यांचा सहयोग मिळेल. प्रगतीच्या संधी मिळू शकतात. कार्यक्षेत्रामध्ये वृद्धी होऊ शकते. मेहनत जास्त करावी लागेल.
वृश्चिक राशी: वृश्चिक राशींच्या लोकांचे मन अशांत राहील. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. एखाद्या मित्राच्या सहयोगाने नोकरीची संधी उपलब्ध होईल. नोकरीमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.
धनु राशी: धनु राशींचे लोकांचे मन अशांत राहील. अनावश्यक रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायामध्ये अडचणी येऊ शकतात. पण व्यवसाय वाढीसाठी वडिलांकडून आर्थिक मदत मिळू शकते.
मकर राशी: मकर राशींच्या लोकांना आत्मविश्वासाची कमी जाणवेल. पण मन प्रसन्न राहील. आईच्या तब्येती बाबतीत चांगली बातमी मिळेल. व्यवसायामध्ये वृद्धी होईल. लाभाच्या संधी प्राप्त होतील.
कुंभ राशी: कुंभ राशींच्या लोकांच्या मनामध्ये चढ-उतार निर्माण होतील. स्वतःवर नियंत्रण ठेवा. कौटुंबीक शांतता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करा. खर्चांमध्ये वाढ होईल. वडिलांकडून आर्थिक मदत मिळेल.
मीन राशी (Rashi Bhavishya): मीन राशींच्या लोकांचे मन प्रसन्न राहील. आत्मविश्वास वाढेल. शैक्षणिक कार्यामध्ये यश मिळेल. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात सन्मान मिळेल.
टीप
भविष्याबद्दल (Rashi Bhavishya) दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.