TVS iQube: भारतीय टू-व्हीलर निर्माता टीवीएस मोटर कंपनी (TVS) ने देशामध्ये एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. नवीन इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube चे नवीन व्हर्जन आहे ज्याला TVS iQube ST नाव दिले गेले आहे. स्कूटर चे दोन व्हर्जन स्टँडर्ड आणि एस ची विक्री मार्केटमध्ये आधीपासून केली जात आहे. नवीन स्कूटरचे लाँग रेंज व्हेरिएंट आहे. आहे. यामध्ये सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त फीचर्स पाहायला मिळती. या स्कूटरची स्पर्धा भारतीय मार्केटमध्ये हीरो इलेक्ट्रिक, विडा आणि ओला सारख्या कंपन्यांचा स्कूटरसोबत आहे.Buy Now…
TVS iQube स्टायलिश लुक
iQube इलेक्ट्रिक स्कूटर दिसायला खूपच जबरदस्त आहे. हि भारतीय मार्केटमध्ये मिळणाऱ्या सर्वात चांगल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सपैकी एक आहे. जर तुम्ही डेली युजसाठी इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हि तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन होऊ शकते. कंपनीने ऑटो एक्सपो 2023 मध्ये TVS iQube ST ला शोकेस केले होते. लुकच्या बाबतीत ST आणि S ट्रिम्स दरम्यान खूप जास्त अंतर नाही आहे. ST ला इतर दोन व्हेरिएंटच्या तुलनेत वेगळे कलर आणि स्कूटरवर ‘ST’ बॅजिंग मिळते.
रेंज आणि चार्चिंग टाईम
इतर व्हेरिएंटच्या तुलनेत iQube ST मध्ये सर्वात मोठा बॅटरी पॅक आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इतर दोन प्रकारांच्या 3.04 kWh च्या तुलनेत 4.56 kWh बॅटरी आहे. iQube ST ची राइडिंग रेंज इको मोडमध्ये 145 किमी आणि पॉवर मोडमध्ये 110 किमी आहे. याशिवाय, बॅटरी पॅक 0 ते 80 टक्के चार्ज करण्यासाठी 4 तास 6 मिनिटे लागतात आणि फास्ट चार्जर वापरल्यास, 0 ते 80 टक्के बॅटरी पॅक चार्ज करण्यासाठी फक्त 2 तास 30 मिनिटे लागतात.
टॉप स्पीड आणि फीचर्स
iQube ST ची टॉप स्पीड 82 kmph आहे. इलेक्ट्रिक मोटरचे पीक पॉवर आउटपुट 4.4 kW आहे आणि त्याची रेटेड पॉवर 3 kW आहे तर पीक टॉर्क आउटपुट 140 Nm आहे आणि रेटेड टॉर्क आउटपुट 33 Nm आहे. आणखी एक विशेष फिचर ST व्हेरिएंटला स्पेशल बनवते ते म्हणजे यामधील असलेली 17.78 सेमी टचस्क्रीन इंस्ट्रूमेंट क्लस्टर. हि जॉयस्टिकने देखील युज करता येते. स्कूटर ओटीए अपडेट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि कनेक्टेड टेक सोबत येते.
TVS iQube Electric STD लोन EMI डाउन पेमेंट
TVS-iQube इलेक्ट्रिकचे सर्वात स्वस्त व्हेरिएंट iQube Standard ची ऑन-रोड प्राईस 1,61,907 रुपये (tvs iqube price) आहे. या स्कूटरला तुम्ही फक्त 20 हजार रुपये डाउन पेमेंटमध्ये घरी घेऊन जाऊ शकता. यानंतर तुम्हाला 1.42 लाख रुपये लोन करावे लागेल. समजा जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने 3 वर्षांसाठी लोन घेतले तर तुम्हाला पुढील 36 महिन्यांसाठी 4,516 रुपये EMI म्हणजेच मासिक हप्ता भरावा लागेल. TVS iQube इलेक्ट्रिक STD व्हेरिएंटला फायनांस केल्यास, 20 हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज लागेल.
TVS iQube Electric S लोन EMI डाउन पेमेंट
TVS iQube Electric Scooter च्या टॉप व्हेरिएंट iQube S ची ऑन-रोड किंमत 1,77,948 रुपये आहे. जर तुम्ही हि स्कूटर 20 हजार रुपये डाउन पेमेंट सोबत फायनांस केली तर तुम्हाला जवळ जवळ 1.58 लाख रुपये लोन घ्यावे लागेल. TVS च्या या अप्रतिम इलेक्ट्रिक स्कूटरवर 9 टक्के व्याजदराने 3 वर्षांसाठी कर्ज घेतल्यास, तुम्हाला पुढील 3 वर्षांसाठी 5,024 रुपये EMI म्हणून मासिक हप्ता भरावा लागेल. TVS iQube S व्हेरिएंटला फायनांस केल्यास, 23 हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज लागेल. टीप: TVS iQube इलेक्ट्रिकला फायनांस करण्यापूर्वी तुम्ही TVS मोटर कंपनीच्या शोरूमला भेट देऊन सर्व फायनांस डिटेल जरूर चेक करा.
हेही वाचा: टाटाची जबरदस्त ई-साइकल, फक्त 1 रुपयात चालणार 10 किलोमीटर, रेंज देखील जबरदस