इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे स्टाईल, फीचर्स आणि मायलेजमध्ये जबरदस्त असलेली TVS ची बाईक, किंमत फक्त इतकी

TVS Raider 125: TVS मोटरसायकल निर्माता कंपनी भारतीय मार्केटमध्ये एकापेक्षा एक मोटरसायकल आणत असते. या सेगमेंट मधील सर्वात शानदार मोटरसायकल टीवीएस रेडर 125 ला मानले जाते. कारण हि बाईक पॉवरफुल इंजिनसोबत स्पोर्टी लुक मध्ये शानदार मायलेज देते. शिवाय यामध्ये खूपच अ‍ॅडवांस्ड फीचर्स मिळतात.

टीव्हीएस रेडर 125 ला टीवीएस ने आपल्या सेगमेंटमध्ये नुकतेच सामील केले आहे. भारतीय बाजारपेठेत सध्या असलेल्या इतर मोटारसायकलींशी स्पर्धा करणे हा या बाईकच्या समावेशाचा एकमेव उद्देश आहे. कारण या सेगमेंट मध्ये टीवीएस मोटरसायकल जवळ हि पहिली मोटरसायकल आहे जी या किंमतीमध्ये सर्वात शानदार मायलेज फीचर्स आणि स्पोर्टी लुक सोबत सादर केली जाते.

TVS Raider 125

TVS Raider 125 Engine

टीवीएस रेडर 125 मध्ये शक्तिशाली इंजिन आहे. यामध्ये 124.8 सीसी सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, थ्री-व्हॉल्व्ह इंजिन चा वापर करण्यात आला आहे. जे 7,500 rpm वर 11.2bhp ची पॉवर आणि 6,000 rpm वर 11.2nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन पाच-स्पीड गियर बॉक्सशी जोडलेले आहे. या इंजिनच्या मदतीने तुम्ही फक्त 5.1 सेकंदात 0 ते 60 किलोमीटर प्रति तास वेग वाढवू शकता. तर यामध्ये तुम्हाला ताशी 99 किलोमीटरचा टॉप स्पीड मिळेल.

TVS Raider 125

TVS Raider 125 Mileage

टीवीएस रेडर 125 च्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर हि बाईक 55 ते 60 किलोमीटर प्रति लिटर पर्यंतचे शानदार मायलेज देते. या मोटरसायकलचे एकूण वजन 123 किलो आहे आणि बाईकच्या फ्यूल टँकची कॅपॅसिटी 10 लिटरची आहे.

TVS Raider 125 Features

टीवीएस रेडर 125 च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला 5 इंच फुली डिजिटल कलर डिस्प्ले मिळतो. यामध्ये तुम्हाला स्मार्टफोन कनेक्टिविटी, ब्लूटूथ कनेक्टिविटी, कॉल अलर्ट, एसएमएस अलर्ट सोबत व्हॉईस असिस्टेड नेव्हिगेशन सिस्टम देखील मिळतो. शिवाय याच्या इतर फीचर्समध्ये तुम्हाला स्पीडोमीटर, टेकोमीटर, ट्रिप मीटर, गियर पोजीशन, फ्यूल गेज सर्विस इंडिकेटर, स्टँड अलर्ट आणि टाईम पाहण्यासाठी घड्याळ यासारखे फीचर्स मिळतात.

TVS Raider 125

TVS Raider 125 Price

टीवीएस रेडर 125 च्या प्राईस बद्दल बोलायचे झाले तर भारतीय मार्केटमध्ये एकूण चार व्हेरिएंट आणि 10 कलर्स ऑप्शनमध्ये हि बाईक उपलब्ध आहे.

व्हेरिएंटकिंमत
रेडर 125 सिंगल सीट – डिस्क97,054 रुपये
रेडर 125 डिस्क97,998 रुपये
रेडर 125 सुपर स्क्वाड संस्करण1,01,161 रुपये
रेडर 125 स्मार्टएक्सनेक्ट1,06,573 रुपये

TVS Raider 125 Suspensions And Brakes

बाईकच्या सस्पेंशन सेटअप मध्ये पुढच्या बाजूला टेलीस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस प्रीलोड-अ‍ॅडजस्टेबल मोनो-शॉकद्वारे या बाईकला नियंत्रित केले गेले आहे. याचे ब्रेकिंग फंक्शन करण्यासाठी दोन्ही व्हील्सला संयुक्त ब्रेकिंग सिस्टम सोबत ड्रम ब्रेक जोडले गेले आहे.

हेही वाचा: अवघ्या इतक्या EMI प्लॅन मध्ये घरी घेऊ जा स्टाईलिश लुकची Honda Activa, जाणून घ्या फीचर्स आणि इतर डिटेल्स