म्हणून माझ्याकडचं सोनं नाणं सगळं गहाण ठेऊन मी तो फार्महाउस खरेदी केलाय | Prajakta Mali Farmhouse

Prajakta Mali Farmhouse: कुटुंबातील सर्वात मोठ कर्ज घेऊन अभिनेत्री प्राजक्ता माळीने जुलै 2023 फार्म हाऊस खरेदी केला होता. यादरम्यान तिने काही फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर करून चाहत्यांना हि बातमी दिली होती. आपल्या स्वप्नातलं फार्महाऊस (Prajakta Mali Farmhouse) खरेदी करण्यासाठी अभिनेत्रीला तिच्या कुटुंबियांकडून खूप मदत मिळाली होती. अभिनेत्रीने आपल्या ड्रीम हाऊससाठी कुटुंबामध्ये सर्वात मोठे कर्ज घेतले होते. हे कर्ज कसं फिटेल अशी कुटुंबियांना धाकधूक होती. मात्र तिच्या आईचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने याबद्दल एका मुलाखतीदरम्यान मोठी माहिती शेयर केली आहे.

Prajakta Mali Farmhouse

Prajakta Mali Farmhouse

अभिनेत्री मुलाखतीमध्ये म्हणते कि, फार्महाऊस खरेदी करणं माझ्यासाठी खूप मोठं धाडस होतं. कारण माझ्याकडे घरासाठी तितके बजट नव्हते. पण जेव्हा मी हे घर बघितलं होतं तेव्हाच ते मला खूप आवडल होतं. त्यासाठी मी माझ्या जवळची सगळी पुंजी पणाला लावली होती. महत्वाच म्हणजे मला निसर्गाची खूप आवड असल्यामुळे म्हणूनच मी हे फार्महाऊस खरेदी करण्याच्या निर्णय घेतला. प्राजक्ताने हे फार्महाऊस (Prajakta Mali Farmhouse) खरेदी करण्यासाठी जवळचे सगळे पैसे गुंतवले होते. शिवाय आईची एफडी, भावाची चैन देखील मोडली होती. तेव्हा कुठे तिचे स्वप्न पूर्ण झाले.

Prajakta Mali Farmhouse

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने आपल्या फार्महाऊसची वस्त्शांती केली होती. यादरम्यान तिचे कुटुंबीय देखील तिथे उपस्थित होते. आजी-आजोबा गावचे सगळे नातेवाईक यांच्यासोबत तिने घराची पूजा केली होती. प्राजक्ता माळी चे ड्रीम होमचे स्वप्न पूर्ण झाले असले तरी तिने मुंबईमध्ये देखील एखादे घर घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्राजक्ता फक्त अभिनेत्रीच नाही तर एक उद्योजिका म्हणून देखील ओळखली जाते.