Akshaya Deodhar: अक्षया देवधरचे वयाच्या 9 व्या वर्षांपासून ते 45 वर्षांपर्यंतच्या मुलींना महिलांना आवाहन, म्हणाली; ‘कॅन्सर होऊ नये म्हणून…’

Akshaya Deodhar: कॅन्सरसारखी गंभीर अराजाने सध्या डोके वर काढले आहे. या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हाईवल कॅन्सर यासारख्या कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. बऱ्याचवेळा यावर उपाय काय असा प्रश्न उपस्थित केला जातो.

अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) हिने यावर एक उपाय महिलांना सुचवला आहे. या आजारावर आजारावर व्हॅक्सीन उपलब्ध असल्याचे तिने निदर्शनास आणून दिले आहे. कॅन्सर होऊ नये याची काळजी घेण्यासाठी अभिनेत्रीने हे व्हॅक्सीन मुलींना द्या अशी तिने विनंती केली आहे. यावर सविस्तर माहिती देताना अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) म्हणते कि “सर्व्हाईकल कॅन्सरवर एक व्हॅक्सीन आलेलं आहे ‘ एच पी व्ही’ असं या व्हॅक्सीनचं नाव आहे. याचे तीन डोस असतात आणि डोसचा कोर्स पूर्ण करणे गरजेचे आहे. मला मला खेद वाटतो की या व्हॅक्सीनबद्दल मला अजिबात माहिती नव्हती. हे व्हॅक्सीन येऊन बरेच दिवस झालेले आहेत मात्र अजूनही कोणाला याबाबत फारशी माहिती नाही.

व्हिडीओ शेयर करत दिली माहिती (Akshaya Deodhar)

मला हे आता समजल आहे म्हणून मी ते व्हॅक्सीन घेतल आहे. माझे दोन डोस कम्प्लीट झाले आहेत. तिसऱ्या डोससाठी मला अजून दोन महिने थांबायचे आहे. कॅन्सरबाबत महिलांनी जागरूक होणं खूप गरजेचं आहे. जर माझा हा व्हिडीओ पुरुष बघत असतील तर त्यांनी आपल्या आजूबाजूच्या महिलांना जरूर सांगा. हा कोर्स पूर्ण करण्यासाठी तुम्ही जवळच्या स्त्री रोग तज्ञाला भेटू शकता. पण ज्यांना जवळचे स्त्री रोग तज्ञ माहीत नाहीत त्यांनी पुण्यातील आपटे रोडवरील बिनीवाले क्लिनिकला भेट द्या जिथे मी ही ट्रीटमेंट घेत आहे. वयाच्या ९ व्या वर्षांपासून ते ४५ वर्षांपर्यंत मुलींनी, महिलांनी हे व्हॅक्सीन घेणं गरजेचं आहे. जेवढ्या लवकर तुम्ही हे व्हॅक्सीन घेणार तेवढा चांगला परिणाम तुम्हाला मिळणार आहे.

हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवा. असे म्हणत अभिनेत्री अक्षया देवधरने (Akshaya Deodhar) महिलांना कॅन्सरबाबत जागरूक राहण्याच्या सल्ला दिला आहे. अक्षयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मराठी सेलेब्रिटी देखील तिच्या व्हिडीओचे कौतुक करत आहेत. २०२२ मध्ये सर्व्हाईकल कॅन्सरवर ही व्हॅक्सीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. शाळांमध्ये मुलींना हि लास देण्यात आली होती पण याबाबत अधिक जनजागृती होणे खूप गरजेचे आहे असे मत अक्षयाने व्यक्त केलं आहे.

हेही वाचा: सुगड पूजन ते नैवैद्याचं ताट, देशमुखांच्या सुनबाईंनी ‘अशी’ साजरी केली मकर संक्रांत