भर कार्यक्रमात अक्षय कुमारने ठेवला प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ड्रेसवर पाय अन् तिने केलं असं काही, व्हिडीओ व्हायरल

‘बडे मियां छोटे मियां’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. या इव्हेंटचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या इव्हेंटला चित्रपटातील स्टारकास्ट अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, मानुषी छिल्लर व अलाया फर्निचरवाला उपस्थित होते.

‘बडे मियां छोटे मियां’ चित्रपटाच्या या कार्यक्रमात चारही कलाकार मंचावर उभे राहून पोज देत होते, यावेळी अक्षय कुमारजवळ अलाया उभी होती. तिने लाँग टेल शॉर्ट ड्रेस घातला होता. त्या ड्रेसवर अक्षय कुमारचा पाय पडला. तिचा ड्रेस अक्षयच्या शूजखाली अडकला. त्यानंतर बराच वेळ अलाया अक्षयने त्यावरून पाय हटवण्याची वाट पाहत होती. नंतर अक्षयला लक्षात आलं आणि त्याने पाय हटवला व तो तिथून दूर झाला. Read More…