Sara Ali Khan भाजलेल्या जखमेसह सारा अली खानने केला रॅम्प वॉक, व्हिडीओ व्हायरल

Sara Ali Khan Video ‘मर्डर मुबारक’ या चित्रपटामुळे अभिनेत्री सारा अली खान सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. सारा नेहमी तिच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अशातच सध्या साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण तिचं कौतुक करत आहेत.

अभिनेत्री सारा अली खानचा हा व्हायरल व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, सारा भाजलेल्या जखमेसह आत्मविश्वासाने रॅम्प वॉक करताना दिसत आहे. ती निळ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये खूप सुंदर दिसत आहे. यावेळी तिने पोटावर भाजलेल्या जखमेचा मेकअप न करताना, ती जखम फ्लॉन्ट करताना पाहायला मिळत आहे. Read More…