Shrenu Parikh Wedding: मराठमोळ्या अभिनेत्याने गुजराती अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ, लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

Shrenu Parikh Wedding: श्रेनु पारिख टीव्ही इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री ‘इश्कबाज़’ मध्ये गौरीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाली होती. शिवाय ती ‘इस प्यार को क्या नाम दूं’ सारख्या शोमध्ये देखील दिसली होती. श्रेनुने 21 डिसेंबर 2023 रोजी तिचा बॉयफ्रेंड अक्षय म्हात्रेसोबत लग्न (Shrenu Parikh Wedding) केले आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून श्रेनुने फोटो शेयर केले आणि त्यानंतर तिच्या लग्नाच्या अनेक झलक समोर आल्या, ज्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून श्रेनु पारिख आणि अक्षय म्हात्रे यांनी लग्नाचे फोटोज (Shrenu Parikh Wedding) शेयर केले आहेत आणि त्यामध्ये ते खूपच क्युट दिसत आहेत. प्रत्येक फोटोमध्ये दोघे कपल गोल्स सेट करताना दिसत आहेत. वेडिंग फोटोज शेयर करताना श्रेनुने ‘टेकन फॉरेव्हर’ असे लिहिले आहे आणि तिने लग्नाची तारीख मागे लिहिली आहे.

श्रेनु पारिख ची ब्राइडल एंट्री (Shrenu Parikh Wedding)

यादरम्यान इंस्टाग्राम वर श्रेनु पारिखचा आणखी एक व्हिडी मिळाला, ज्यामध्ये ती ब्राइडल एंट्री करताना दिसत आहेत. श्रेनु एंट्री करताना खूपच इमोशनल झाली आणि ती स्वतःला सारवताना दिसली. तिचा वेडिंग वेन्यु देखील खूपच शानदार दिसत अह्तों. जेव्हा ती आपल्या पारंपारिक गुज्जू दुल्हन च्या ड्रेसमध्ये चालत होती. बॅकग्राउंड मध्ये आपण आतिषबाजी देखील पाहू शकतो.

अक्षय म्हात्रे ची एंट्री

दुसऱ्या क्लिपमध्ये आपण अक्षय म्हात्रेची एंट्री पाहू शकतो. वराने आपल्या जबरदस्त एंट्रीने सर्वांना हैराण केले. आपण अक्षयला ओपन रुफ करमध्ये पाहू शकतो, जी पांढऱ्या फुलांनी सजवली आहे. ‘बचना ऐ हसीनों गाण्यावर थिरकत तो आपल्या वधूला नेण्यासाठी येत आहे. वरातीमध्ये पाहुणे देखील त्यांच्यासोबत नाचताना दिसत आहेत.

लग्नासाठी वधू-वरांचे कपडे

आपल्या लग्नाच्या दिवशी श्रेनु आणि तिचा पती अक्षय खूपच सुंदर पारंपारिक वेशामध्ये दिस्त्ले. श्रेनु एक परी सारखी दिसत होती. तिने लाल-नारंगी रंगाचा डबल-टोन लेहेंगा घातला होता, ज्यासोबत भरतकाम केलेली चोळी होती, ज्यामध्ये एक नेकलाईन होती. दुसरीकडे अक्षय खूपच हँडसम दिसत होता. त्याने लाल रंगाची शेरवानी निवडली आणि याला मॅचिंग दोशाला आणि क्रीम रंगाची पगडी घातली होती. शिवाय आपल्या लगानच्या फोटोजसोबत दोघेही बेस्ट कपल दिसत होते.

हेही वाचा: थाटात पार पडलं मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच लग्न, पहा लग्नाचे फोटोज

Leave a comment