Kabadiwala Success Story: इंजिनीअरिंगची नोकरी असून देखील भंगार गोळा करणे म्हणजे जरा विचित्रच आहे. पण दोन तरुणांनी असे करून आज करोडोंचा बिजनेस उभा केला आहे. आज त्यांच्या स्टार्टअपची वार्षिक उलाढाल 10 करोड पेक्षा जास्त आहे. ते स्वतः तर आर्थिकरित्या समृद्ध झालेतच त्याचबरोबर त्यांनी 300 लोकांना रोजगार दिला आहे.
भोपाळ स्थित आयटी इंजिनीअर अनुराग असाटी आणि रविंद्र रघुवंशी यांनी 2014 मध्ये द कबाडीवाला (Kabadiwala Success Story) नावाने स्टार्टअप सुरु केला. त्यांनी वेबसाईट देखील तयार केली. जास्त रिसर्च न करता त्यांनी काम सुरु केले. काम करता करता ते शिकत गेले. हळू-हळू त्यांना कॉलवर ऑर्डर येऊ लागल्या. काही महिन्यांपूर्वी त्यांना मुंबईच्या एका गुंतवणूकदार कंपनीकडून 15 करोड रुपयांचे फंडिंग मिळाले. भोपालमध्ये एखाद्या भंगार व्यवसाय स्टार्टअपला एवढा मोठं निधी मिळण्याची हि पहिलीच वेळ होती.
कॉलेजची फी भरण्यासाठी नव्हते पैसे – Kabadiwala Success Story
अनुरागने भोपालच्या ओरिएंटल कॉलेजमधून इंजिनीअरिंग केले आहे. तो सांगतो कि, एकेकाळी माझ्याकडे इंजिनीअरिंगची फी भरण्यासाठी देखील पैसे नव्हते. सुरुवातीला मी कर्ज घेतले. काही दिवसांनंतर कॉलेज व्यवस्थापनाने शुल्कामध्ये सवलत दिली. अशा प्रकारे मी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले.
इथून सुचली कल्पना
अनुराग असाटी आणि रविंद्र रघुवंशी सांगतात कि जेव्हा याची सुरुवात केली तेव्हा दोन वर्षे आम्ही स्वतः घरा-घरामधून येणाऱ्या बुकिंगवर भंगार उचलायला जात होतो. तेव्हा कुटुंबियांना याबद्दल काहीच माहिती नव्हते कि आम्ही काय करत आहे. जेव्हा आम्ही पुढे सरकलो आणि चांगली प्रोग्रेस होऊ लागली तेव्हा कुटुंबियांना याबद्दल सांगितले. यानंतर कुटुंबीयांनी देखील आम्हाला सपोर्ट केला. त्यानंतर आम्ही द कबाडीवाला स्टार्टअप सुरु केला.
अनुरागने सांगितले कि त्यांच्याजवळ स्टार्टमध्ये गुंतवण्यासाठी पैसे नव्हते. डिग्री पूर्ण केल्यानंतर कौटुंबिक खर्च भागवण्यासाठी नोकरी करावी लागली. नंतर 2015 मध्ये नोकरी सोडली. सुरुवातीला कुटुंब आणि मित्रांच्या मदतीने 25 लाख रुपयांची गुंतवणूक केली. चार वर्षानंतर गुंतवणूकदारांसमोर प्रेझेन्टेशन देऊन त्यांना फंडिंगसाठी तयार केले. 2019 मध्ये एंजल इन्वेस्टरने टीन करोड रुपयांची गुंतवणूक केली होती.