Savita bhabhi Song: अभिनेत्री सई ताम्हनकरच्या मादक अदांची झलक दाखवणारं ‘सविता भाभी’ गाणं सोशल मिडियावर घालतंय धुमाकूळ

Savita Bhabhi Song by Alok Rajwade: ‘सविता भाभी… तू इथंच थांब!’ असे पोस्टर काही दिवसांपासून सोशल मिडियावर व्हायरल होत होते. यानंतर समजलं कि ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ (Ashleel Udyog Mitra Mandal) नावाचा चित्रपट दर्शकांच्या भेटीला येणार आहे. आता नुकतेच या चित्रपटामधील ‘सविता भाभी’ (savita bhabhi song by alok rajwade) हे गाणं रिलीज झालं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सविता सविता भाभी कोण असणार आहे हे समजला होतं.

सविता भाभी गाणं रिलीज (Savita bhabhi Song)

आता नुकतेच या चित्रपटामधील सविता भाभी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गाण्यामध्ये मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील हॉट अभिनेत्री सई ताम्हनकरच्या मादक अदा या गाण्यामध्ये पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आलोक राजवाडे यांनी केलं आहे. सई सोबत चित्रपटामध्ये पर्ण पेठे, अभय महाजन, अमेय वाघ हे देखील मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरला दर्शकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता हे गाणं सोशल मिडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

या गाण्याचे बॉल साकेत कानेटकर यांनी लिहिले आहे आणि त्यांनीच या गाण्याला सांगितल दिले आहे. सई सोबत अभिनेत्री पर्ण पेठेचा देखील लुक हटके पाहायला मिळत आहे. सई ताम्हनकरने सोशल मिडियावर या गाण्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘तुला बघाया जमली गर्दी लांब, सविता भाभी तू इथंच थांब!’ असं हे गाणं आहे. अश्लील शब्द म्हंटल कि सर्वांच्या नजरा वळतात, पण आता ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपटच येणार असल्यामुळे आता याची जोरदार चर्चा रंगली आहे.

ट्रेलरमध्ये पाहायला मिळत असल्याप्रमाणे एका मुलाच्या से क्सशुअल फॅंटसीज पूर्ण होत नसल्यामुळे तो सविता भाभी या पात्राकडे कसं पाहतो, त्यातून तिला प्रत्यक्ष भेटण्याची ओढ निर्माण होते आणि नंतर प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय असते हे या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल असा अंदाज आहे. हा चित्रपट 6 मार्च रोजी रिलीज होणार आहे.

हेही वाचा: Panchak Title Song Out: माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’ चे टायटल साँग रिलीज, भीतीची बाराखडी एकदा पहाच