CUET PG 2024: 2 तास, 100 प्रश्न, 400 गुण, मार्च मध्ये होणार परीक्षा, मास्टर्स करायचं असेल तर समजून घ्या संपूर्ण पेपर पॅटर्न

CUET PG 2024: भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये अनेक टप्प्यांवर बदल झाले आहेत. त्याचा परिणाम शालेय शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत दिसून येतो. आता भारतातील बहुतेक विद्यापीठांमध्ये CUET परीक्षेद्वारे प्रवेश घेतला जातो. मास्टर्सचा अभ्यास करू इच्छिणारे उमेदवार CUET PG 2024 परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात.

भारतातील कोणत्याही केंद्रीय विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यास्तही सीयूईटी PG परीक्षा 2024 उत्तीर्ण होने अनिवार्य आहे. राज्य सरकार संचालित अनेक विद्यापीठांमध्ये CUET PG परीक्षेद्वारे प्रवेश मिळणार आहे. अनेक डीम्ड आणि खाजगी विद्यापीठे देखील CUET PG स्कोअरच्या आधारे प्रवेश देत आहेत. तुम्ही देखील सीयूईटी PG 2024 परीक्षेसाठी cuet.nta.nic.in वर फॉर्म भरू शकता.

CUET PG 2024 परीक्षा तारीख: कधी होणार सीयूईटी पीजी परीक्षा 2024?

सीयूईटी पीजी 2024 परीक्षासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली आहे. हि संगणक आधारित परीक्षा आहे. सीयूईटी पीजी परीक्षा 11 मार्च ते 28 मार्च, 2024 दरम्यान होणार आहे. गेल्या वर्षी 4 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सीयूईटी पीजी परीक्षा साठी अर्ज केला होता. हि परीक्षा इंग्लिश आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये होणार आहे. यासाठी उमेदवारांना परीक्षेचा कालावधी 2 तासाचा दिला जाणार आहे. हि परीक्षा वर्षातून फक्त एकदाच होते.

CUET PG परीक्षा पॅटर्न: प्रत्येक योग्य उत्तरासाठी मिळणार 4 गुण

सीयूईटी पीजी परीक्षा 400 गुणाची असते. यामध्ये मल्टिपल चॉइस प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सीयूईटी पीजी परीक्षा 2024 मध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातील. याद्वारे स्पष्ट होते कि प्रत्येक प्रश्न 4 गुणाचा असेल. तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जाईल. म्हणजेच सीयूईटी पीजी परीक्षेमध्ये निगेटिव मार्किंग देखील आहे.

सीयूईटी पीजी पेपर किती विभागांमध्ये विभागलेला आहे?

सीयूईटी पीजी पेपर दोन विभागांमध्ये विभागला गेला आहे.
  • विभाग A (25 प्रश्न) – भाषा आकलन/शाब्दिक क्षमता, सामान्य ज्ञान, गणितीय क्षमता आणि विश्लेषणात्मक कौशल्ये
  • विभाग B (75 प्रश्न) – यामध्ये डोमेनवर आधारित प्रश्न विचारले जातात.