सुवर्णसंधी ! तब्बल 20 हजार रुपयांनी स्वस्त झाली ‘हि’ इलेक्ट्रिक स्कूटर, आत्ताच करा बुकिंग

Ather 450S: 2024 सुरु झाल्यानंतर एथर एनर्जी खूपच चर्चेमध्ये आली आहे. कंपनीने आपले नवीन मॉडेल 450 एपेक्स नवीन परफॉर्मन्स सह लाँच केले आहे. एथर एनर्जीचा आपल्या विक्रीची संख्या आणखी वाढवण्याच्या निर्धार आहे. याच कारणामुळे एथर ने आपल्या 450S EV च्या किंमतीमध्ये कपात केली आहे. एथर ने 450Sच्या किंमतीमध्ये 20,000 रुपयांची कपात केली आहे. कंपनीने या अपडेटचे कोणतेही कारण सांगितलेले नाही. तथापि असे मानले जात आहे कि आपल्या प्रतिस्पर्धी कंपनी ओलाला टक्कर देण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

Ather 450S 20,000 रुपयांनी स्वस्त

Ather ने 450S चा MRP 20,000 रुपयांनी करण्याच्या निर्णय घेतला आहे. Ather च्या ट्विटमध्ये पाहू शकता कि Ather 450S ची किंमत 1,37,999 लाख रुपयांवरून ₹1,09,999 पर्यंत कमी करण्यात आली आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.

Ather 450S

115 किमी रेंज

एथर 450S (Ather 450S) सिंगल 2.9 kWh बॅटरी व्हेरियंटसह उपलब्ध आहे, जी 115 किमीची दावा केलेली रेंज ऑफर करते. या स्कूटरचा टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रति तास आहे. स्कूटर 3.9 सेकंदात 40 किमी/ताशीचा वेग गाठते. यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशनसह एलसीडी इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले आहे.

इतर स्पेसिफिकेशन

Top Speed90 km/h
Warp™ ModeNo
Certified Range115 km
TrueRange™90 km
ColoursCosmic Black, Still White, Salt Green, Space Grey
Dashboard17.7 cm (7”) DeepView™ display
NavigationTurn by Turn
Charging (0-80%)6 hr 36 min

फीचर्स

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिपमीटर, क्लॉक, पॅसेंजर फूटरेस्ट, चार्जिंग पोर्ट, राइडिंग मोड यांसारखे अप्रतिम फीचर्स दिले गेले आहेत. शिवाय इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एलईडी हेडलाइट आणि टेललाइट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प आणि लो बॅटरी इंडिकेटर यासारखे फीचर्स देखील मिळतात.

हेही वाचा: सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक सायकल, अवघ्या 4 हजारात घरी आणा, रेंज देखील जबरदस्त