जबरदस्त पॉवर बँक ! फक्त 1 तास चार्ज करा आणि मिळवा एक महिना वीज, जाणून घ्या किंमत

Blackview OSCAL: पूर्वी पेक्षा आता लोडशेडिंग खूप कमी झाले आहे. पण तरी देखील अधून मधून लाईट बंद होण्याच्या त्रास कमी करण्यासाठी लोक आपल्या घरामध्ये इन्व्हर्टर किंवा पर्यायी मार्गाने वीज मिळवतात. असा असाच एक जबरदस्त पॉवर बँक Blackview कंपनीने मार्केटमध्ये आणला आहे.

हा पॉवर बँक दिसायला जरी छोटा असला तर एखाद्या पॉवर ग्रिडपेक्षा कमी नाही. हि पॉवर बँक पोर्टेबल आहे, म्हणजेच तुम्ही ती तुमच्यासोबत कुठेही नेऊ शकता. त्याची रचना सुटकेस किंवा बॅगसारखी करण्यात आली असून त्याला ओढून नेण्यासाठी चाकेही आहेत.

हे पॉवर बँक खासकडून कॅम्पिंगला जाणाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त आहे. Blackview OSCAL PowerMax 3600 मध्ये एकूण 15 बॅटरी पॅक आहेत, ज्याद्वारे याची क्षमता 3.6 kWh ते 57.6 kWh पर्यंत वाढवली जाऊ शकते. कंपनीने दावा केला आहे कि याची बॅटरी फुल चार्ज केल्यानंतर तुम्हाला 30 दिवसांपर्यंत वीज मिळेल. तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत देखील याचा वापर करू शकता.

Blackview OSCAL

1.2 तासांत होईल पूर्ण चार्ज – Blackview OSCAL

या पॉवर बँकेसोबत तुम्हाला रॅपिड चार्जिंग फीचर मिळते. यामध्ये 3600W ची चार्जिंग स्पीड मिळते, जी 15 बॅटरी पॅक 1.2 तासांत पूर्णपणे चार्ज करते. शिवाय तुम्ही या पॉवर बँकेद्वारे स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू देखल चार्ज करू शकता. यासोबत तुम्ही यावर हाय पॉवर वाले होम अप्लायंस देखील चालवू शकता यामध्ये तुम्हाला 14 आउटपुट पोर्ट्स दिले गेले आहेत, ज्याद्वारे तुम्ही होम अप्लायंस आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरू शकता.

25 वर्षे खराब होणार नाही बॅटरी

या पॉवर बँकेची बॅटरी २५ वर्षांपर्यंत खराब होणार नाही असा दावा कंपनीने केला आहे. हि पॉवर बँक T1 चिप सह येते. यामध्ये इन्स्टॉल केलेले इन्स्टॉल मध्ये तुम्ही इनपुट आणि आउटपुट माहिती पाहू शकता. तुम्ही हि पॉवर बँक रिमोटद्वारे देखील कंट्रोल करू शकता. या पॉवर बँकला तुम्ही सोलर पॉवर, कार जनरेटर, AC पॉवर सप्लाय द्वारे चार्ज करू शकता. या पॉवर बँकची किंमत 1799 डॉलर म्हणजेच जवळ जवळ 1.49 लाख रुपये आहे.

हेही वाचा: रतन टाटांचा मोठा धमाका, नॅनो पुन्हा येणार बाजारात, जाणून घ्या एका चार्जमध्ये किती देणार रेंज