Bhavatharini Passes Away: साऊथ संगीतसृष्टीला मोठा धक्का, प्रसिद्ध गायिकेचे दुखद निधन, 47 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Bhavatharini Passes Away: सिनेजगतामधून एक वाईट बातमी समोर आली आहे. दिग्गज गायिका आणि म्युझिक कंपोजर इलैयाराजाची मुलगी भवतारिणीचे निधन (Bhavatharini Passes Away) झाले आहे. ती गेल्या काही दिवसांपासून सतत आजारी असायची आणि श्रीलंकामध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. भवातारिणीचे निधन श्रीलंकामध्ये गुरुवारी 25 जानेवारी रोजी संध्याकाळी 5.20 वाजते जाहले. तिच्या मृत्यूचे कारण कॅन्सर असल्याचे सांगितले जात आहे.

गायिका भवतारिणीचे निधन (Bhavatharini Passes Away)

माहितीनुसार भवतारिणी आर्युर्वेदिक उपचारासाठी श्रीलंकाला गेली होती. तिथे तिने अंतिम श्वास घेतला. (Bhavatharini Passes Away) तिचे पार्थिव चेन्नईला आणले जाणार आहे त्यानंतर तिच्यावर अंतिम संस्कार केले जातील. रिपोर्टनुसस्र उपचारादरम्यान भवतारिणीच्या गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन असल्याचे आढळून आले, पण नंतर तिला पोटाचा कॅन्सर असल्याची पुष्टी झाली. भवतारिणी कर्करोगाच्या शेवटच्या म्हणजेच चौथ्या टप्प्यात होत्या.

24 वर्षापूर्वी मिळाला पहिला राष्ट्रीय पुरस्कार

भवतारिणी एक उत्तम गायिका तर होतीच त्याचबरोबर ती म्युझिक कंपोजर देखील होती. तिला भारती चित्रपटामधील मयिल पोला पोन्नू ओन्नू गाण्यासाठी 2000 मध्ये बेस्ट प्लेबॅक फीमेल सिंगरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. मयिल पोला पोन्नू ओन्नू गाणे भवतारिणीचे वडील इलैयाराजा यांनी स्वतः कंपोज केले होते. या लोकप्रियतेनंतर भवतारिणीने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि संगीतविश्वात खूप नाव कमावले.

भवतारिणी गायिका म्हणून सुरु केले होते करियर

भवतारिणीने प्रभुदेवाच्या ‘रसैया’ या चित्रपटातून आपल्या गाण्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिने अरुणमोझी आणि एसएन सुरेंद्र यांच्यासोबत मस्ताना मस्ताना हे गाण्याला आपला आवाज दिला होता. नंतर तिने माय फ्रेंड चित्रपटासाठी मुझिक कंपोजर म्हणून कम केले. या चित्रपटाला रेवतीने दिग्दर्शित केले होते. तर माय फ्रेंड मध्ये शोभनाने फिमेल लीड भूमिका केली होती. शिवाय भवतारिणी ने रेवती चा चित्रपट फिर मिलेंगे साठी म्युझिक कंपोज केले होते, ज्याची खूप चर्चा झाली होती.

हेही वाचा: प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक साजिद खान यांचे निधन, कर्करोगाशी झुंज अयशस्वी