Yuvraj Singh Love Story: क्रिकेट आणि बॉलीवूडचे नाते खूप जुने आहे. अनेक क्रिकेटर्स आणि बॉलीवूड अभिनेत्रींचे रिलेशन राहिले आहेत. माझी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंहसोबत देखील असेच झाले. तो अभिनेत्री हेजल कीचच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. पण हेजलसोबत लग्न करण्यासाठी त्याला खूप काही करावे लागले. १२ डिसेंबर १९८१ रोजी जन्मलेल्या युवराज सिंहला हेजल कीच कशी मिळाली चला तर पाहूयात. (Yuvraj Singh Love Story)
युवराज सिंह ने सांगितली लव्ह स्टोरी (Yuvraj Singh Love Story)
युवराज सिंह आणि त्याची पत्नी हेजल कीच एकदा द कपिल शर्मा शोमध्ये पोहोचले होते. जिथे दोघांनी अनेक गुपिते उघड केली. यादरम्यान युवराजने सांगितले कि हेजल कीच जवळ जवळ साडे तीन वर्षे त्याला भेटण्यासाठी नकार देत होती. युवराजनुसार जेव्हा त्याने हेजलला पाहिले तेव्हा त्याला असे वाटले कि एखादा मुलगा चालत येत आहे. असे यामुळे कारण त्याला अभिनेत्रीची चाल एखाद्या मुलाप्रमाणे वाटली होती.
युवराजने (Yuvraj Singh Love Story) कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितले कि मला हेजलला भेटून खूपच चांगले वाटले. मी कॉफीसाठी विचारले तेव्हा तिने होय म्हंटले. ज्या दिवशी कॉफी प्यायला जायचे होते त्या दिवशी ती फोन बंद करून बसायची. मी एकदा म्हंटले कि मला आजार झाला आहे तेव्हा तिने गुड लक म्हंटले. मला वाटले कि हि मुलगी खूपच विचित्र आहे. मी तिचा नंबर फोनमधून डिलीट करून टाकला.
युवराज सिंह पुढे म्हणाला कि तीन वर्षानंतर हेजल मला फेसबुकवर भेटली. ती माझ्या एका कॉमन फ्रेंडची दोस्त होती. मी त्याला विचारले कि तू तिला कसे ओळखतोस. त्यावेळी त्याने म्हंटले कि मी तिला भेटलो आहे. नंतर मी त्याला म्हंटले कि तिच्यापासून दूर राहायचे.
नंतर त्याने मला म्हंटले कि मी का तिच्यापासून दूर राहू तेव्हा मी म्हंटले कि तीन वर्षे तिने मला घास नाही घातली आणि भेटली देखील नाही. स्वतःला काय समजेत काय माहिती. तू तिच्या पासून दूर राहा कारण मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे. काही दिवसांनंतर तिने मला फेसबुकवर जोडले.
युवराजने जेव्हा हेजलला लग्नासाठी विचारले गेला तिने म्हंटले कि तू मला ठीक वाटतोस मी पाहीन. युवराजने म्हंटले कि हेजलने मला होय म्हणायला साडे तीन वर्षे घालवली आणि होय म्हंटल्यानंतर देखील एक वर्षे टांगते ठेवले. युवराज आणि हेजलने २०१६ मध्ये लग्न केले होते.
हेही वाचा: दिनेश कार्तिकने खरेदी केले नवीन घर, वास्तुशांतीचे फोटो केले शेयर, पहा फोटोज