Dipika Padukone Net Worth: कमाईच्या बाबतीत दीपिका पादुकोणच्या पुढे दिग्गज स्टार्स देखील फिक्के, इतक्या संपत्तीची आहे मालकीण

Dipika Padukone Net Worth: बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या ओम शांती ओम चित्रपटामधील सँडी म्हणजेच दीपिका पादुकोणचा जन्म 5 जानेवारी 1986 रोजी डेनमार्क कोपेनहेगेन मध्ये झाला होता. सध्या ती आपल्या आगामी फायटर चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री फक्त आपल्या अभिनयामुळेच नाही तर कमाईच्या बाबतीत देखील पुढे आहे. ती सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. फक्त चित्रपटच नाही तर दीपिका ब्रँड एंडोर्समेंट, फिल्म प्रोडक्शन आणि अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूकीद्वारे प्रचंड कमाई करते.

Highest पेड एक्ट्रेस आहे दीपिका (Dipika Padukone Net Worth)

सर्वात पहिला दीपिका पादुकोणच्या चित्रपटाच्या कमाईबद्दल जाणून घेऊया. माहितीनुसार बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त चार्ज करणाऱ्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये दीपिका पादुकोणचे नाव आहे. ती एका चित्रपटासाठी 15 ते 30 करोड रुपये चार्ज करते. तिची महिन्याची सरासरी कमाई जवळ जवळ 2 करोड रुपये पेक्षा जास्त आहे. चित्रपटाशिवाय ती सोशल मिडियावरून देखील चांगली कमाई (Dipika Padukone Net Worth) करते. इंस्टाग्रामवर तिला 80 मिलियन लोक फॉलो करतात. इंस्टावर एका ब्रँडची जाहिरात करण्यासाठी किंवा इन्स्टावर एखादी पोस्ट शेयर करण्यासाठी ती सुमारे 1.5 कोटी रुपये चार्ज करते.

Dipika Padukone Net Worth

अभिनेत्रीजवळ आहे इतकी संपत्ती

सेलिब्रिटी नेटवर्थ डॉक कॉम नुसार मॉडेलिंगमधून आपल्या करियरची सुरुवात करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोणचे सध्याचे एकूण नेटवर्थ जवळ जवळ 40 मिलियन डॉलर म्हणजेच 330 करोड रुपये पेक्षा जास्त आहे. दीपिकाने 2006 मध्ये कन्नड चित्रपट ‘ऐश्वर्या’ मधून आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली होती.

दीपिकाचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट ओम शांती ओम सुपरहिट झाला होता आणि तिची गणना टॉपच्या अभिनेत्रींमध्ये केली जाऊ लागली. यानंतर दीपिकाने बॉलीवूडमध्ये बाजीराव मस्तानी, चेन्नई एक्सप्रेस, रामलीला, पद्मावत, ये जवानी है दीवानी सारख्या अनेक ब्लॉक बस्टर चित्रपटांमध्ये कम केले. शिवाय तिने हॉलीवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला. दीपिका ने XXX: Return of Xander Cage American चित्रपटामध्ये विन डीजल सोबत काम केले आहे.

हेही वाचा: Nayanthara Net Worth: 100 करोडच्या घरापासून ते प्राईवेट जेटपर्यंत ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे नयनतारा

सतत वाढत गेली नेटवर्थ

मिडिया रिपोर्टनुसार दीपिका पादुकोणच्या नेटवर्थ मध्ये सतत वाढ होत आहे. 2018 मध्ये तिची एकूण संपत्ती (Dipika Padukone Net Worth) 113 करोड रुपये होती जी 2019 मध्ये 150 करोड रुपयांपर्यंत पोहोचली. यानंतर 2020 मध्ये तिची एकूण संपत्ती 198 करोड रुपये झाली. 2021 मध्ये दीपिकाची संपत्ती आणखीनच वाढली आणि ती जवळ जवळ 225 करोड रुपयांपर्यंत पोहोचली. ताज्या आकडेवारीनुसार तिची एकूण संपत्ती (Dipika Padukone Net Worth) 330 करोडपेक्षा जास्त आहे.

Dipika Padukone Net Worth

दीपिका चित्रपटामधून तर कमाई करतेच शिवाय ती प्रोडक्शन हाऊस मधून देखील कमाई करते. तिने दोन बॉलीवूड चित्रपट देखील प्रोड्यूस केले आहेत. तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव छपाक आणि दुसऱ्या चित्रपटाचे नाव 83 आहे. तथापि तिचे हे दोन्ही चित्रपट काही कमाल दाखवू शकले नाहीत.

दीपिका पादुकोणचे लग्न 13 नोव्हेंबर 2018 रोजी इटलीतील लेक कोमो येथे झाले होते. तिच्या कमाईचा (Dipika Padukone Net Worth) अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो कि फोर्ब्स इंडिया च्या 2018 च्या सर्वात श्रीमत सेलिब्रेटीज च्या लिस्टमध्ये पहिल्यांदाच अभिनेत्रीने जागा बनवली होती. लिस्टमध्ये दीपिका पादुकोण चौथ्या नंबरवर होती. तिने 2018 मध्ये 112.8 करोडची कमाई केली होती.

अनेक ब्रँडसोबत मोठी कमाई

आलिशान लाईफ जगणारी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण चित्रपट, प्रोडक्शन हाऊस, सोशल मिडिया शिवाय ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून भरपूर कमाई (Dipika Padukone Net Worth) करते. तिने मिंत्रा, तनिष्क, टेटले ग्रीन टी आणि लॉरेल सारख्या मोठ्या ब्रँड्स द्वारे भरपूर पैसा कमवला आहे. दीपिकाच्या प्रॉपर्टी बद्दल बोलायचे झाले तर तिचे मुंबईमध्ये दोन आलिशान फ्लॅट आहेत. माहितीनुसार यामधील एक फ्लॅट तिने लग्नाच्या अगोदर घेतला होता. अभिनेत्रीच्या कार कलेक्शनमध्ये Audi, Mercedes आणि Rang Rover सारख्या आलिशान कार्स सामील आहेत.

अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणुकीतून कमाई

अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ने जवळ जवळ सहा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये फर्लेंको, पर्पल, ब्लूस्मार्ट, एपिगेमिया, बेलाट्रिक्स एयरोस्पेस आणि फ्रंटरो सामील आहेत. यामध्ये फर्लेंको फर्नीचर रेंटल प्लॅटफॉर्म आहे तर पर्पल कॉस्मेटिक्स आणि स्किन केयर प्रोडक्ट विकणारे ऑनलाइन स्टोअर आहे.

तर एपिगेमिया एक प्रीमियम ऑल-नॅचुरल ग्रीक योगर्ट ब्रँड आहे आहे आणि बेलाट्रिक्स एयरोस्पेस एक छोटी सेटेलाइट कंपनी आहे. फ्रंटरो बद्दल बोलायचे झाले तर हा 2020 मध्ये लाँच करण्यात आलेला हा एक लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. ब्लूस्मार्ट दिल्ली-एनसीआर मध्ये कॅब सेवा देणारी कंपनी आहे. दीपिकाने यामध्ये जवळ जवळ 3 मिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. शिवाय तिने ड्रम्स फूड आणि एक स्पेस टेक्नोलॉजी स्टार्टअप ऐरोस्पेस मध्ये देखील पैसे गुंतवले आहेत.