Hanuman Trailer: अंगावर शहारे आणणारा सीन आणि मंत्र जापने भरलेली क्लिप, ‘हनुमान’ चा ट्रेलर रिलीज

Hanuman Trailer: प्रशांत वर्माच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘हनुमान’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. चित्रपटाच्या टीजरने लोकांमध्ये खूप उत्सुकता निर्माण केली होती. आता चित्रपटाचा ट्रेलर (Hanuman Trailer) देखील अशीच कमाल दाखवत आहे. 19 डिसेंबर रोजी मेकर्सने चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. अभिनेता तेजा सज्जा मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. टीजर रिलीज होण्यापूर्वी साऊथ इंडियाच्या बाहेर चित्रपटाची फारशी चर्चा नव्हती. पण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा चित्रपट मोठ्या चित्रपटांपैकी एक बनताना दिसत आहे. पहा ‘हनुमान’ चा ट्रेलर.

ट्रेलरची सुरुवात हिरोच्या पाण्यात बुडी मारण्यापासून होते. त्यामध्ये तो जरा विचित्रच पाहायला मिळतो. त्यानंतर सीनमध्ये तो एका सुपरहिरो सारखा दिसतो. नंतर येतो चित्रपटामधील विलन, जो जगावर राज्य करू इच्छितो. आपले लक्ष साध्य करण्यासाठी तो वास्तविक शक्तीच्या शोधात आहे. तो आपल्या सैन्यासोबत अंजनाद्रि मध्ये येतो आणि तिथे सर्व काही नष्ट करतो. चांगले आई वाईट यामधील लढा स्टोरीला आणखीन मजबूत बनवतो. हनुमान (Hanuman Trailer) चा शेवटचा सीन श्रीराम जप करताना आणि बर्फ फोडताना आहे. हा अंगावर शहारे आणणारा सीन आहे.

Hanuman Trailer

‘हनुमान’चा ट्रेलर – Hanuman Trailer

प्रशांत वर्मा एक टॅलेंटेड रायटर आहे, जे आपल्या लेखनाने आणि स्टोरीने चाहत्यांना नेहमी चकित करतात. ट्रेलरमध्ये अंजनाद्रि ला उत्कृष्टरित्या दाखवले गेले आहे. तेजा सज्जा एक दलित तरुणाच्या भूमिकेत आहे, जो नंतर सुपरहीरो बनून समोर येतो. सुपरव्हिलन म्हणून विनय राय घातक आहे. दशरधि शिवेंद्रची सिनेमॅटोग्राफीही अप्रतिम आहे. एकूणच हा ब्लॉगबस्टर चित्रपट बनवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला आहे.

कधी रिलीज होणार ‘हनुमान’?

Hanuman Trailer

हा इंडियन सुपरहीरो चित्रपट प्रशांत वर्माचा सिनेमॅटिक युनिव्हर्सचा पहिला चित्रपट आहे. ट्रेलर खूपच इंप्रेस करत आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाळूक घालेल यामध्ये काही शंका नाही. निर्माता के निरंजन रेड्डी निर्मित ‘हनुमान’ 12 जानेवारी रोजी जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Also Read: Operation Valentine Teaser: विक्की कौशलचा सर्जिकल स्ट्राइक विसरून जाल, साऊथच्या ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’चा जबरदस्त टीजर रिलीज

Leave a comment