सिंगल चार्जमध्ये 160 किमीची रेंज, स्मार्टफोनपेक्षा कमी किंमतीतील 3 जबरदस्त इलेक्ट्रिक सायकल | Himiway Electric Bike

Himiway Electric Bike: प्रसिद्ध इलेक्ट्रिक सायकल निर्माता कंपनी Himiway ने आपल्या नवीन ई-बाइक्स सादर केल्या आहेत. ज्यामध्ये Himiway Pony, Himiway Rambler आणि Himiway Rhino या सायकल सामील आहेत. कंपनी दावा करते कि जुन्या मॉडेलच्या तुलनेमध्ये या नवीन मॉडल इंप्रूव्ड बॅटरी लाइफ आणि एक्सटेंडेड रेंज सह येतात. चला तर Himiway ई-बाइक्स (Himiway Electric Bike) बद्दल विस्ताराने जाणून घेऊया.

Himiway Electric Bike किंमत

Himiway Rhino ची किंमत 3,199 डॉलर (2,63,939 रुपये) आहे तर डिस्काउंट नंतर 2,999 डॉलर (2,47,438 रुपये) मध्ये खरेदी केली जाऊ शकते. तर Himiway Rambler ची किंमत 1,399 डॉलर (1,15,427 रुपये) आहे. तथापि डिस्काउंट नंतर 1,299 डॉलर (1,07,176 रुपये) मध्ये हि सायकल उपलब्ध आहे आणि Himiway Pony ची किंमत 549 डॉलर (45,296 रुपये) आहे जी डिस्काउंट नंतर 499 डॉलर (41,170 रुपये) मध्ये मिळते.

Himiway Electric Bike

Himiway ई-बाइक्स चे स्पेसिफिकेशंस

Himiway Pony (हिमीवे पोनी)

हिमीवे पोनी एक मिनी बाइक आहे ज्याचे वजन फक्त 33 एलबीएस आहे आणि ती 240 एलबीएस पर्यंत लोड घेऊ शकते. हि बाइक 300W मोटरने सुसज्ज आहे जी 6 मैल (25.74 किमी) स्पीड देते. रेंज बद्दल बोलायचे झाले तर हि सिंगल चार्जमध्ये 20 मैल (32.18 किमी) अंतर कापू शकते. जे ग्राहक कमी अंतरासाठी इलेक्ट्रिक बाइकच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी हि बाइक उत्तम पर्याय ठरू शकते.

Himiway Rambler (हिमीवे रॅम्बलर)

हिमीवे रॅम्बलर सिटी ई-बाईक आहे जी स्पीड आणि कंफर्ट दोन्ही देते. या बाइकमध्ये 500W ची मोटर देण्यात आली आहे जी 62Nm चा टॉर्क जनरेट करते. लांबच्या प्रवासासाठी हि बाइक एक चांगला ऑप्शन आहे. या बाइकमध्ये 720Wh बॅटरी देण्यात आली आहे जी सिंगल चार्जमध्ये 55 मैल (88.51 किमी) ची रेंज देते.

Himiway Electric Bike
Himiway Rhino (हिमीवे ऱ्हायनो)

हिमीवे ऱ्हायनो हि ड्युअल बॅटरी इलेक्ट्रिक माउंटन बाइक आहे जी ८५ Nm टॉर्क जनरेट करते. या बाइकमध्ये दिलेली 1,000W ची मोटर सिंगल चार्जमध्ये 28 मैल (45 किमी) स्पीड देते. e-MTB मध्ये दोन 48 V 15 Ah बॅटरी देण्यात आली आहे जी 1,4050 Wh पॉवर सोबत 100 मैल (160 किमी) रेंज देते. हिमीवे ऱ्हायनो त्या रायडर्ससाठी बेस्ट आहे जी दुर्गम भागांमध्ये फिरू इच्छितात. Himiway दावा करते कि Himiway Rhino सध्या यूएस मध्ये उपलब्ध असलेली सर्वात लांब रेंज देणारी एकमेव इलेक्ट्रिक बाइक (Himiway Electric Bike) आहे. हि इलेक्ट्रिक बाइक फक्त 5 तासात फुल चार्ज होते.

हेही वाचा: घडी होणारी इलेक्ट्रिक सायकल, उत्तम रेंजसोबत मिळणार दमदार फीचर्स, किंमत फक्त…