रामलला प्राणप्रतिष्ठेनंतर मिळालेल्या प्रासादामध्ये काय काय मिळाले? टीव्हीच्या ‘लक्ष्मणा’ने शेयर केला व्हिडीओ

Sunil Lahri Showing Ram Mandir Prasad: रामानंद सागर यांच्या रामायण या प्रसिद्ध शो रामायण मधील पात्र तुम्हाला नक्कीच आठवत असतील. रामानंद सागरची टीव्ही सिरीयल रामायण मध्ये लक्ष्मणची भूमिका साकारणारे सुनील लहरी (Sunil Lahri) नुकतेच 22 जानेवारी रोजी राम मंदिर प्राण प्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) मध्ये सामील झाले होते.

यासोबत रामायण शोमधील राम अरुण गोविल आणि सीता दीपिका चिखलिया देखील सामील झाले होते. अशामध्ये आता राम मंदिरची पुन आणि प्राण प्रतिष्ठामध्ये सामील झालेल्या सुनील लहरी यांनी मिळालेल्या प्रसादाचा एक व्हिडीओ शेयर केला आहे जो पाहिल्यानंतर चाहते भावूक होत आहेत.

सुनील लहरी यांनी दाखवला राम मंदिरचा प्रसाद (Sunil Lahri Showing Ram Mandir Prasad)

sunil lahri
sunil lahri

सुनील लहरीने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून जो व्हिडीओ शेयर केला आहे त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे कि, तुम्हाला माहिती आहे का कि रामलला प्राणप्रतिष्ठेनंतर मिळालेल्या प्रासादामध्ये काय मिळाले…आणि मी त्या प्रसादाचे काय करणार आहे. (Sunil Lahri Showing Ram Mandir Prasad) या व्हिडीओमध्ये सनिलच्या हातामध्ये एक स्टीलचा डब्बा पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये बेसनचे लाडू आहे. त्याचबरोबर सुनील लहरी यांनी दाखवले कि प्राण प्रतिष्ठाच्या प्रसादामध्ये लाडू सोबत कुंकू, आणि शबरीचे बोरं देखील मिळाले आहेत. यासोबत त्यांनी दाखवले कि यामध्ये तुळशीची माळ, रुद्राक्ष, शबरी मनुका, कुमकुम, केशर, दिया, गंगाजल देखील दिले आहे. शिवाय एक मोठा डब्बा मिळाला आहे ज्यामध्ये मिठाई होती.

प्राण प्रतिष्ठा प्रसादाचे काय करणार?

सुनील लहरी यांनी जो व्हिडीओ शेयर केला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे कि ते त्या प्रसादाचे (Sunil Lahri Showing Ram Mandir Prasad) काय करणार आहेत. त्यांनी म्हंटले कि ते शकत होईल तितक्या लोकांना तो प्रसाद वाटणार आहेत. कारण प्रत्येकाला रामललाच्या प्राण प्रतिष्ठाला जाण्याची इच्छा होती पण असे होऊ शकले नाही. यामुळे ते असे करण्याचा विचार करत आहेत. त्यांनी हे देखील म्हंटले कि इतर लोकांनी देखील असे करायला हवे.

हेही वाचा: खरोखरच घरपोच मिळणार का राम मंदिरचा प्रसाद, जाणून घ्या संपूर्ण सत्य !