हुंडाई आपल्या धाकड SUV वर देत आहे 2 लाखांची सूट, हि संधी हातची सोडू नका

Hyundai Tucson Discount: जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हि बातमी तुमच्या खूपच महत्वाची आहे. कारण हुंडाईचे कानी निवडक डीलरशिप या महिन्यामध्ये सर्व मॉडेल रेंजवर मोठी सूट डेट आहेत. कंपनी आपली दमदार एसयूवी टक्सन (Hyundai Tucson) वर मोठी सूट देत आहे. जानेवारी 2024 मध्ये ग्राहक त्यांचे 2 लाख रुपये वाचवून हि एसयूवी घेऊन आणू शकतात.

हे बेनिफिट्स रोख सूट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. भारतीय मार्केटमध्ये या एसयूवीची किंमत 29.02 लाख रुपयांपासून सुरु होते. हि एसयूवी 7 कलर ऑप्शन आणि दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. चला तर आपण टक्सन (Hyundai Tucson) फ्लॅगशिप SUV वर उपलब्ध असलेल्या सवलतींवर एक नजर टाकूया.

कोणत्या मॉडेलच्या इअर युनिटवर किती सूट?

हुंडाई टक्सन (Hyundai Tucson) वर जानेवारी 2024 मध्ये मिळणाऱ्या सवलतीबद्दल बोलायचे झाले तर, या महिन्यामध्ये ग्राहकांना या SUV वर 2 लाख रुपयांची थेट रोख सूट मिळू शकते. ही सवलत MY23 (मॉडल इयर 2023) यूनिट वर लागू आहे. तर 2024 मॉडेल (MY24) च्या युनिट्सवर 50,000 रुपयांची रोख सवलत उपलब्ध आहे, जी येत्या आठवड्यामध्ये स्थानिक डीलरशिपपर्यंत पोहोचू शकते.

Hyundai Tucson चे फीचर्स

हुंडाई टक्सन (Hyundai Tucson) च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 10.25-इंचचा ड्रायव्हर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिस्प्ले आणि 10.25-इंचाची टचस्क्रीन युनिट इंफोटेनमेंट सिस्टम लते. शिवाय एसयूव्हीमध्ये पॅनोरामिक सनरूफ, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी रिमोट ऑपरेशन सह आणि ड्यूल जोन क्लाइमेट कंट्रोल फीचर पाहायला मिळते.

यामध्ये पावर्ड, हीटेड आणि वेंटिलेटेड फ्रंट सीट वायरलेस फोन चार्जिंग सारखे फीचर्स देखील दिले गेले आहेत. सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर पॅसेंजर सेफ्टी साठी सहा एअरबॅग्ज, 360 डिग्री कॅमेरा, हिल होल्ड/डिसेंट कंट्रोल, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स आणि ADAS (लेटेस्ट ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) दिले गेले आहेत.

इंजिन पॉवरट्रेन

हुंडाई टक्सन (Hyundai Tucson) च्या पॉवरट्रेन बद्दल बोलायचे झाले तर हि एसयूवी कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल व्हेरियंटमध्ये 2-लिटर इंजिन आहे, जे 156ps पॉवर आणि 192nm टॉर्क जनरेट करते. इंजिनसोबतच यात 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

डिझेल व्हेरियंटमध्ये 2-लिटर इंजिन आहे, जे 186ps पॉवर आणि 416nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. याच्या टॉप डिझेल व्हेरियंटला ऑल-व्हील-ड्राइव्ह ऑप्शनसोबत देखील खरेदी केले जाऊ शकते. यासोबतच यामध्ये टेरेन मोड्स (स्नो, मड, सॅन्ड) सोबत HTRAC ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टम आहे, जी एक जबरदस्त ड्रायव्हिंग अनुभव प्रदान करते.

हेही वाचा: टाटा नेक्सन ईवी समोर तगडं आव्हान, महिंद्राची नवीन इलेक्ट्रिक SUV बाजारात दाखल होण्यास सज्ज