सारा अली खाननं घेतलं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगचे दर्शन, महादेवा समोर जोडले हात, फोटोज सोशल मिडियावर व्हायरल

Sara Ali Khan Visits Grishneshwar Jyotirlinga Temple: बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) मुस्लीम असून देखील इतर धर्मांवर श्रद्धा ठेवते. 22 जानेवारी रोजी राम मंदिर प्राण प्रतिष्ठाचे आयोजन केले गेले होते, जिथे अनेक बॉलीवूड कलाकार उपस्थित होते. तथापि खान कुटुंबातून कोणीही प्राण प्रतिष्ठामध्ये सामील झाले नव्हते. सारा अली खान ला देखील प्राण प्रतिष्ठाचे आमंत्रण मिळाले नव्हते पण भोलेबाबाच्या दरबारी (Sara Ali Khan Visits Grishneshwar Jyotirlinga Temple) पोहोचली.

भोलेनाथच्या दरबारात पोहोचली सारा (Sara Ali Khan Visits Grishneshwar Jyotirlinga Temple)

सारा अली खान नेहमी मंदिरांना भेट देत असते. यावेळी ती घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग येथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली. तिथे तिने महादेवाचे दर्शन घेतले आणि नंदीजीच्या कानामध्ये देखील आपले मागणे मांडताना दिसली. अभिनेत्रीने याचे फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत. महादेवाच्या भक्तीनेने तिने लोकांची मने जिंकली आहेत.

महाराष्ट्रामधील औरंगाबाद येथून 20 किलोमीटर दूर वेरूळ गावामध्ये असलेल्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये सारा अली खान ने भोलेनाथचे दर्शन(Sara Ali Khan Visits Grishneshwar Jyotirlinga Temple) घेतले. भोलेनाथ समोर हात जोडले तर नंदीजीच्या कानामध्ये तिने आपली मनोकामना मागितली. तथापि साराची हि पहिली वेळ नाही कि ती मंदिरामध्ये गेली आहेत. याआधी देखील ती अनेक मंदिरामध्ये पाहायला मिळाली आहे. अभिनेत्री भोलेबाबाची भक्त आहे. ती भोलेनाथाच्या मंदिरामध्ये अनेकवेळा जाताना दिसते. दरम्यान अभिनेत्रीने भोलेनाथचे फोटो शेयर करताना कॅप्शनमध्ये जय भोलेनाथ लिहिले आहे.

साराचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल

सारा अली खानने इंस्टाग्रामवर फोटो शेयर करताच ते अल्पावधीचे व्हायरल झाले आहेत. चाहत्यांना साराची महादेवाची भाकी खूप पसंद येत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले आहे कि, साराचे इतके मोठे महत्व बॉलिवूडमध्ये क्वचितच पाहायला मिळते. तर काही युजर्सने अभिनेत्रीच्या पोस्टवर जय श्रीराम तर काहींनी हर हर महादेवची कमेंट केली आहे.

वर्कफ्रंट

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती 2023 मध्ये विक्की कौशलसोबत जरा हटके जरा बचके चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप पसंद केला गेला होता. आता अभिनेत्री स्काय फोर्समध्ये पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आलियानं नेसलेल्या साडीचीच सर्वत्र चर्चा, फोटोज सोशल मिडियावर व्हायरल