Ind vs Eng Women T20: T20 सिरीज गमावल्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत झाली भावूक, यांच्यावर फोडले पराभवाचे खापर

Ind vs Eng Women: भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची T20 सिरीज गमावली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या सिरीजमधील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारताचा चार गाडी राखून पराभव केला. या विजयासोबत इंग्लंडने 2-0 ने सिरीज आपल्या नावावर केली आहे. 10 डिसेंबर रोजी सिरीजमधला अंतिम सामना खेळला जाणार आहे.

Ind vs Eng Women T20

Ind vs Eng Women T20 – पराभवानंतर हरमनप्रीत भावूक

दुसऱ्या T20 सामन्यामध्ये भारतीय फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. संपूर्ण संघ 16.2 ओवर्समध्ये 80 धावांवर बाद झाला. Ind vs Eng Women T20 सिरीज गमावल्यानंतर भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर खूपच निराश दिसली. हरमनप्रीत कौरने पराभवाचे खापर फलंदांवर फोडले.

हरमनप्रीत सामन्यानंतर म्हणाली, आम्हाला नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून खेळायचे आहे, पण दुर्दैवाने आमचे काही फलंदाज चेंडूचा अचूक अंदाज घेऊ शकले नाहीत. शिवाय इंग्लंडने अचूक गोलंदाजी केली आणि त्यांनी आम्हाला मुक्तपणे खेळू दिले नाही. जर आम्ही 30-40 धावा आणखी बनवल्या असत्या तर यामुळे खूप फरक पडला असता. मला माझ्या संघावर गर्व आहे. आम्ही शेवटपर्यंत हार मानली नाही.

इंग्लंडची कर्णधार हीदर नाइट म्हणाली कि, त्यांचा संग क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल. हीदर पुढे म्हणाली कि, आमच्या सलामीच्या फलंदाजांना धावा बनवले सोपे नव्हते आणि रेणुका सिंहने खूपच चांगली गोलंदाजी केली, पॉवरप्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करणे आणि विकेट न गमावणे हे आमचे ध्येय होते. यानंतर टेस्ट सामना खेळायचा आहे आणि त्याआधी सिरीज 3-0 ने जिंकायची आहे.

Ind vs Eng Women T20 – दोनच फलंदाजांना गाठता आला दुहेरी आकडा

टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने सुरुवातीपासूनच विकेट्स गमावल्या. भारताकडून फक्त स्मृति मंधाना आणि जेमिमा रोड्रिग्स या दोघींनाचा दुहेरी धावसंख्या गाठता आली. जेमिमाने सर्वात जास्त 30 आणि स्मृतीने 10 धावा केल्या. इंग्लंड संघाकडून चार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन बेल आणि सारा ग्लेन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. ट साइवर-ब्रंट आणि फ्रेया केम्प यांना एक-एक विकेट मिळाली.

Ind vs Eng Women T20

81 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या इग्लंड संघाने 11.2 ओवर्समध्येच टारेगट पूर्ण केले. एलिस कॅप्सीनेने सर्वाधिक 25 धावा केल्या आणि नेट साइवर-ब्रंटने 16 धावांची खेळी केली. रेणुका सिंह आणि दीप्ति शर्मा यांना प्रत्येक दोन विकेट्स घेण्यात यश मिळाले. दोन विकेट घेणाऱ्या चार्लोट डीनची ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवड करण्यात आली.

Leave a comment