Kalki 2898 AD Release Date Out: प्रभासच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी रिलीज होणार कल्कि 2898 एडी

Kalki 2898 AD Release Date Out: 2023 च्या अखेरीस रिलीज झालेला साऊथ सुपरस्टार प्रभास चा सालार चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 400 करोडचा टप्पा ओलांडला आहे आणि जगभरामध्ये 700 करोडपेक्षा जास्ती कमाई करून इतिहास रचला आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच जमला आहे. यादरम्यान आता प्रभासचा बहुप्रतीक्षित चित्रपट कल्की 2898 एडी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. चाहत्यांसाठी गुड न्यूज हि आहे कि चित्रपटाची फायनल रिलीज डेट (Kalki 2898 AD Release Date Out) जाहीर करण्यात आली आहे.

Kalki 2898 AD Release Date Out

कल्कि 2898 एडी रिलीज डेट (Kalki 2898 AD Release Date Out)

प्रभास स्टारर ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी देत या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या रिलीजची अधिकृत तारीख (Kalki 2898 AD Release Date Out) जाहीर केली आहे. निर्मात्यांनी सोशल मिडियावर प्रभासच्या चित्रपटाच्या नवीन पोस्टरसोबत कल्की 2898 एडी’ ची रिलीज डेट जाहीर केली आहे. सायंस-फिक्शन चित्रपटाची रिलीज डेट याआधी टाळण्यात आली होती. हा चित्रपट जानेवारी 2024 मध्ये रिलीज होण्याची अपेक्षा होती. पण आता हा चित्रपट 9 मे 2024 रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज (Kalki 2898 AD Release Date Out) होणार आहे.

नाग अश्विनने केले आहे कल्कि 2898 एडी चित्रपटाचे दिग्दर्शन

नाग अश्विन द्वारा दिग्दर्शित या चित्रपटामध्ये कमल हासन, प्रभास, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन आणि दिशा पटानीने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. सायंस-फिक्शन चित्रपटाची निर्मिती वैजयंती मूवीज द्वारा केली गेली आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये रिलीज होणार आहे. पहिला 2024 मध्ये रिलीज (Kalki 2898 AD Release Date Out) होईल. बातमीनुसार कल्कि 2898 एडी 600 करोडच्या बिग बजटमध्ये बनवला गेला आहे. जो आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपटा मानला जात आहे.

या चित्रपटाला तेलगु आणि हिंदीमध्ये एकाच वेळी शूट केले गेले आहे. चित्रपटाचे म्युझिक संतोष नारायणनने दिले आहे, सिनेमाटोग्राफी जोर्डजे स्टोजिलजकोविकने केली आहे आणि इडिटिंग कोटागिरी वेंकटेश्वर रावने केले आहे.

प्रभास आणि दीपिका पादुकोण वर्क फ्रंट

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर प्रभास सध्या आपल्या नुकतेच रिलीज झालेल्या सालारच्या ग्रँड सक्सेसचा आनंद घेत आहे. या चित्रपटाच्या अगोदर अभिनेत्याचे अनेक चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप ठरले होते. दीपिका पादुकोण च्या वर्क फ्रंट बोलायचे झाले तर अभिनेत्रीचा फायटर चित्रपट 26 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये ती ऋतिक रोशनसोबत स्क्रीन शेयर करताना दिसणार आहे.

हेही वाचा: ‘देवरा’चा टीझर आऊट, ज्युनिअर एनटीआरचा दबंग अंदाज पाहून अंगावर शहरे येतील, पहा व्हिडीओ