Tata Punch आणि Hyundai Exter समोर तगडं आव्हान, Kia ची देशात येतेय लहान SUV कार, पाहा काय असेल खास…

किआ इंडियाने आपलं सगळं लक्ष सध्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटवर केंद्रित केलं आहे. कंपनी लवकरच एक नवीन कार बाजारात लाँच करणार आहे. Kia लवकरच तिसरी SUV भारतीय बाजारात लाँच करू शकते. ही Kia Clavis असू शकते, जी कंपनीची भारतातील पाचवी ऑफर असेल. AY कोडनेम असलेली ही मायक्रो एसयूव्ही चार मीटरपेक्षा कमी लांब असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची चाचणी सुरू झाली आहे आणि अशी अपेक्षा आहे की, उत्पादन मॉडेल २०२४ च्या उत्तरार्धात लाँच केले जाऊ शकते. बाजारात त्याची टक्कर टाटा पंच आणि ह्युंदाई एक्सेटरशी होईल.

रिपोर्ट्सनुसार, Kia Sonet आणि Seltos च्या तुलनेत Clavis चे डिझाईन अधिक बॉक्सी असेल. पुढील बाजूस, यात Kia ची सिग्नेचर ग्रिल, बंपर-माउंट एलईडी हेडलॅम्प, मोठा एअर डॅम मिळू शकते. Kia ची ही नवीन कॉम्पॅक्ट SUV रडार-आधारित ADAS तंत्रज्ञान आणि फ्रंट पार्किंग सेन्सर्सने सुसज्ज असू शकते. फ्रंट ग्रिल आणि ORVM वर स्थापित केलेले कॅमेरे असे सुचवतात की ते ३६० डिग्री कॅमेरासह येऊ शकतात. Read More…