Prathamesh Parab लग्नानंतर प्रथमेश परबने जोडीने केली सत्यनारायण महापूजा, फोटो आले समोर

Prathamesh Parab टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परब Prathamesh Parab आणि क्षितिजा घोसाळकर यांचा विवाहसोहळा गेल्या महिन्यात २४ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला. जानेवारी महिन्यात केळवणाचा फोटो शेअर करत या दोघांनी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची घोषणा केली होती. प्रथमेश आणि क्षितिजा गेली ३ वर्षे एकत्र आहेत. या जोडप्याच्या लग्नाला सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

थाटामाटात लग्न केल्यावर प्रथमेश आणि क्षितिजाने जोडीने सत्यनारायण पूजा केल्याचं पाहायला मिळालं. महापूजेची खास झलक अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली. या पूजेला संपूर्ण परब कुटुंब एकत्र जमल्याचं पाहायला मिळत आहे. या पूजेसाठी प्रथमेश-क्षितिजाने खास पारंपरिक लूक केला होता. अभिनेत्याने शेवाळी रंगाचा सदरा आणि त्यावर गुलाबी रंगाचा शेला परिधान केला होता. तर, क्षितिजाने नवऱ्याला मॅचिंग अशी डार्क शेवाळी रंगाची साडी नेसली होती. पूजा पार पडल्यावर दोघांनीही या सोहळ्यातील खास क्षण त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. Read More…