हे आहेत रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे, Lasun Benefits जाणून व्हाल दंग !

Lasun Benefits मुख्यतः लसणाचा वापर भाजीला फोडणी देण्यासाठी, भाजीची ग्रेव्ही किंवा चटणी बनवण्यासाठी केला जातो. एखाद्या भाजीला चव आणण्याचे काम लसूण करतो. पण फक्त खाद्यपदार्थांना चव आणण्याचेच काम लसूण करत नाही तर त्याचे इतरही अनेक उपयोग आहेत. लसणामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे आपल्याला त्याचा अनेक विकारापासून बचाव करता येतो. आयुर्वेदामध्ये लसणाला वंडर फूड देखील म्हंटले जाते. त्यामुळे लसणाचा आहारामध्ये वापर करणे खूप महत्वाचे असते. लसणाचा सर्वात मोठा फायदा सकाळी अनुशापोटी खाल्याने होतो. म्हणून रोज सकाळी लसणाची एक पाकळी अवश्य खावी आणि नंतर एक ग्लास गरम पाणी प्यावे. जर लसणाची पाकळी चावून खाऊ वाटत नसेल तर ती गरम पाण्याबरोबर गिळून टाकावी.

Lasun

Lasun Benefits लसूण खाण्याचे फायदे

लसणाचा उपयोग हृदयरोगाशी संबंधित तक्रारी दूर करण्यास होतो. नेहमी लसणाचे सेवन केल्यास रक्ताच्या गाठी बनत नाहीत आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो. धमन्यांमधील ब्लॉकेज दूर करण्यासाठी मध आणि लसून एकत्र खावा. हृदयाचा रक्तप्रवाह सुरळीत सुरु राहतो. उच्चरक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी लसूण (Lasun) जरून खावा. शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत ठेवण्याचे खूप महत्वाचे काम करतो.डायरिया किंवा बद्धकोष्ठ या पोटांच्या आजारामध्येहि लसूण आरामदायी ठरतो.

यासाठी थोड्याश्या पाण्यामध्ये लसणाच्या पाच-सहा पाकळ्या साधारण सात-आठ मिनिटे उकळून घ्याव्यात आणि हे पाणी थंड करून प्यावे. या पाण्यामुळे जुलाब आणि बद्धकोष्ठ या दोन्ही विकारांमध्ये आराम मिळतो. लसणाचे पाणी शरीरामधील जे घातक पदार्थ असतात ते बाहेर टाकण्यास मदत करते. लसूण खाल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत मिळते. ज्यांना अपचनाचा त्रास आहे, भूक कमी लागते अशांनी अनुश्यापोटी लसूण जरूर खावा.

Lasun

अॅसिडीटीमध्ये देखील लसूण Lasun फायदेशिर ठरतो.लसणामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि वेदना कमी करणारी तत्वे मोठ्या प्रमाणात असतात. अशामध्ये जर इन्फेक्शनने दातदुखी खूप होत असेल तर लसणाची एक पाकळी जो दात दुखत आहे त्या दाताखाली ठेवावी. हा उपाय केल्यास दातदुखीमध्ये आराम मिळतो. श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये लसूण खूप फायदेशीर ठरतो. सर्दी-पडसे, खोकला, अस्थमा, निमोनिया, ब्रॉन्कायटीस या आजारांमध्ये लसणाचे सेवन केल्यास फायदा होतो.

Also Read

==> Benefits of Clove: यावेळी चघळा फक्त एक लवंग, मिळतील खाण्याचे हे आश्चर्यकारक फायदे

Leave a comment