Bolero Neo Plus: महिंद्रा लवकरच सादर करत आहे 9-सीटर बोलेरो, जाणून घ्या कधी होणार लाँच

Bolero Neo Plus: जर तुम्ही देखील SUV घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे. ऑटो सेक्टर मधील पॉपुलर कंपनी आणि भारतीय कार उत्पादक महिंद्रा अँड महिंद्रा पुढील वर्षी 6, 7 आणि 9 सीटर एसयूव्ही सादर करणार आहे. पुढच्या वर्षी महिंद्राची 6, 7 आणि 9 सीटर एसयूव्ही लाँच करू शकते. ग्राहक देखील महिंद्रच्या मोस्ट अवेटेड अपकमिंग Bolero Neo Plus कार ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

महिंद्राची हि अपकमिंग 9 सीटर बोलेरो SUV एक चालते फिरते घर आहे. हि कार एका मोठ्या किंवा छोट्या कुटुंबासाठी एक बेस्ट ऑप्शन असेल. यामध्ये तुम्ही सहजपणे सुट्ट्या इंजॉय करण्यासाठी ट्रिपला जाऊ शकता. तथापि अजूनपर्यंत या कारची लाँच डेट जाहीर करण्यात आलेली नाही. चला तर जाणून घेऊया या मोस्ट अवेटेड Bolero Neo Plus बद्दल.

Bolero Neo Plus स्पेसिफिकेशन्स

Bolero Neo Plus

महिंद्रा आपल्या बेस्ट सेलिंग SUV महिंद्रा महिंद्र बोलोरो नियोचे अपग्रेड व्हर्जन बोलोरो नियो प्लस (Boloro Neo Plus) लाँच करणार आहे. हि एक 9 सीटर एसयूवी आहे ज्यामध्ये अनेक बदल केले गेले आहेत. जर याच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये एलईडी हेडलॅम्प आणि टेललॅम्प, 7 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॉवर विंडो आणि सेंट्रल लॉकिंग, एअर कंडिशनिंग, ड्युअल एअरबॅग्ज आणि 16 इंच अलॉय व्हील समाविष्ट असू शकतात.

120bhp पॉवर जनरेट करेल इंजिन

Bolero Neo Plus

पॉवर जनरेटबद्दल बोलायचे झाले तर 9 सीटर महिंद्रा बोलेरो एसयूवीमध्ये 2.2 लीटर mHawk डिझेल इंजिन असेल जे 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह जोडले जाईल. हे इंजिन 120bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम असेल. हे तेच इंजिन असेल जे Scorpio N मध्ये देखील येते. तथापि याला री–ट्यून केले जाईल. याची किंमत 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

धुमाकूळ घालण्यासाठी येत आहे महिंद्राची 6–सीटर कार

दुसऱ्या एका टेस्टिंग दरम्यान स्पॉट केलेले फोटो पाहता असे वाटते आहे कि महिंदा आपल्या अपकमिंग 6–सीटर XUV700 ची विक्री पुढच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये करू शकते. महिंद्राची हि कार भारतामध्ये पॉपुलर एसयूवीची रेंज वाढवण्यासाठी मदत करेल. शिवाय महिंदाची Bolero Neo Plus SUV ग्राहकांना 7 सीटरमध्ये देखील मिळेल.

Also Read: Upcoming Maruti Cars: 2024 मध्ये मारुती लाँच करणार या 4 कार्स

Leave a comment