Jui Gadkari: साडी, कपाळी टिळा… अभिनेत्री जुई गडकरीने घेतले उज्जैन येथील महाकालेश्वरचे दर्शन, फोटोज व्हायरल

Jui Gadkari: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जुईने आपल्या अभिनयाने दर्शकांची मनं जिंकली. अभिनेत्री सोशल मिडियावर देखील खूपच सक्रीय असते. नुकतेच जुईने सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर उज्जैनमधील महाकालेश्वराचं दर्शन घेतल्याचं सांगितलं.

Jui Gadkari ने शेयर केले फोटो

Jui Gadkari

जुई गडकरीने सोशल मिडियावरून तिचे काही फोटो शेयर केले आहे. फोटोमध्ये ती साडीमध्ये पाहायला मिळत आहे. जुईने आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून उज्जैन येथी महाकालेश्वरचे दर्शन घेतले. याशिवाय तिने इतर देवस्थानाचे देखील दर्शन घेतले. महाकाल, ओमकारेश्वर, मामलेश्वर, मंगलनाथ, कालभैरव, नवग्रह, सांदीपनी आश्रम, खजराना, राजबाडा, या ठिकाणांना भेट देऊन जुईने आशीर्वाद घेतले आहेत.

जुईने फोटो शेयर करताच चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केलं आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे कि, तुझं मन खूपच सुंदर आणि निरागस आहे. सुंदर मनाच्या माणसांवर देवाचा नेहमी आशीर्वाद असतो. तर एका चाहत्याने लिहिले आहे कि, आजचा बघितलेला सर्वात सुंदर फोटो. अशीच संस्कृती वाढवा, हर हर महादेव. सध्या जुईचे हे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

Jui Gadkari

आजारपणानंतर पुनरागमन

मराठी सिरियल्समधील लाडकी सून म्हणून जुई गडकरीची ओळख आहे. श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी, माझिया प्रियाला प्रीत कळेना, तुजविण सख्या रे… आणि पुढचं पाऊल या सिरियल्समध्ये ती अभिनय करताना पाहायला मिळाली होती. पुढचं पाऊल सिरीयलमधील तिची भूमिका विशेष गाजली होती. बिग बॉस मराठी मध्ये देखील ती सामील झाली होती. आजारपणावर मात करत तिने ठरलं तर मग या सिरीयलमधून छोट्या पडद्यावर पुनरागमन केले.

Leave a comment