National Crush of India actress: या अभिनेत्रींना मिळाला आहे नॅशनल क्रशचा टॅग, लिस्टमध्ये सामील झाले तृप्ती डिमरीचे देखील नाव

National Crush of India actress: मनोरंजन जगतामध्ये खूपच प्रतिस्पर्धा पाहायला मिळते. दर्शकांचे लक्ष वेधून घेणे अभिनेते किंवा अभिनेत्रींसाठी खूपच कठीण काम असते. कधी-कधी यामध्ये अनेक वर्षे लागतात, तर कधी फक्त एक फोटो, एक चित्रपट किंवा एका टीव्ही शोमध्ये देखील होऊन जाते. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या मोहक अदांनी लोकांची मने जिंकून नॅशनल क्रशचा किताब आपल्या नावावर केला.

या अभिनेत्रींना मिळाला आहे National Crush of India चा टॅग

तृप्ती डिमरी
National Crush of India

तृप्ती डिमरी बॉलीवूडमधील एक नवखी अभिनेत्री आहे. नुकतेच रिलीज झालेल्या अ‍ॅनिमल चित्रपटामुळे ती प्रसिद्धीतीच्या झोतात आली. चित्रपटामधील तिच्या आणि रणबीर कपूरच्या बोल्ड सीनची सध्या सर्वत्र चर्चा हॉट आहे. या चित्रपटामधून ती इतकी लोकप्रिय झाली कि लोकांनी तिला नॅशनल क्रशचा टॅग बहाल केला. सध्या अभिनेत्रीच्या फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ होत आहे.

रश्मिका मंदाना
National Crush of India

या लिस्टमध्ये दुसरे नाव रश्मिका मंदानाचे आहे. अ‍ॅनिमल चित्रपटामध्ये अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली आहे. ती साउथच्या अनेक चित्रपटांचमध्ये देखील पाहायला मिळाली आहे. रश्मिकाची निरागसता पाहून लोक तिच्यावर फिदा झाले. तिला अनेक वर्षांपूर्वी नॅशनल क्रशचा टॅग दिला गेला आहे. साऊथ इंडियापासून ते हिंदी हार्टलँडपर्यंत तिचे चाहते मोठ्या संख्येने आहेत.

दिशा पटानी
National Crush of India

दिशा पटानीने एम.एस.धोनी: द अनटोल्ड स्टोरी चित्रपटामधून आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली होती. पाहता पाहता ती रातो-रातो नॅशनल क्रश (National Crush of India) बनली होती. अभिनेत्रीचा चाहता वर्ग करोडोमध्ये आहे. आतापर्यंत तिने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती लवकरच मल्टीस्टारर फिल्म वेलकम टू द जंगलमध्ये पाहायला मिळणार आहे.

प्रिया प्रकाश वारियर
National Crush of India

प्रिया प्रकाश वारियर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला ब्लिंक गर्ल म्हणून देखील ओळखले जाते. जेव्हा तिच्याबद्दल बोलले जाते तेव्हा मनामध्ये फक्त माणिक्य मलाराया चित्रपटामधील गाणे समोर येते. या गाण्यामध्ये तिच्या ब्लिंक च्या सीनवर लाखो दर्शक वेडे झाले होते.

संजना सांघी
National Crush of India

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूरच्या शेवटचा चित्रपट दिल बेचारामध्ये काम करून संजना सांघीने बरीच प्रशंसा मिळवली होती. या चित्रपटामधून तिला खूप प्रेम मिळाले होते. एकाच चित्रपटामधून तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला होता.

साक्षी मलिक
National Crush of India

सोनू के टीटू की स्वीटी चित्रपटामधील एका गाण्यातील साक्षी मलिक लुक खूपच व्हायरल झाला होता. ती आपल्या बॉडी फीचर्ससाठी खूप फेमस आहे. इतकेच नाही तर ती बिग बॉस 13 फेम आसिम रियाजसोबत म्युझिक अल्बममध्ये देखील दिसली आहे.

जेनिफर विंगेट
National Crush of India

जेनिफर विंगेट एक अशी पर्सनालिटी आहे जी फक्त दर्शकांचीच नाही तर अनेक टीव्ही सेलिब्रिटीजची देखील क्रश आहे. आपल्या लुक, अभिनय आणि सौंदर्याने जेनिफर विंगेटचे नाव देखील नॅशनल क्रशच्या (National Crush of India) लिस्टमध्ये सामील आहे.

Leave a comment