New Year Releases 2024: रोमांस, कॉमेडी आणि अ‍ॅक्शनने गाजणार 2024 चे वर्ष, हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करायला तयार

New Year Releases 2024: बॉलीवूडसाठी 2023 हे वर्ष अतिशय धमाकेदार ठरले आहे, पण 2024 हे वर्ष यापेक्षा देखील धमाकेदार असणार आहे. कारण 2024 मध्ये अनेक मोठे आणि बहुप्रतीक्षित चित्रपट (New Year Releases 2024) मोठ्या पडद्यावर येणार आहेत. यामध्ये तुम्हाला रोमांस, कॉमेडी आणि अ‍ॅक्शन देखील पाहायला मिळेल. पुढील वर्षामध्ये एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपट रिलीज होणार आहेत.

नवीन वर्ष 2024 मध्ये रिलीज होणारे चित्रपट (New Year Releases 2024)

New Year Releases 2024

हि लिस्ट (New Year Releases 2024) खूपच लांबलचक आहे. आम्ही तुम्हाला या लिस्टमध्ये पाच उत्कृष्ट चित्रपटांची नावे सांगणार आहोत. हे चित्रपट एकापेक्षा एक सुपर आहेत. या चित्रपटांमध्ये मारामारी रोमांस, कॉमेडी, अ‍ॅक्शन सस्पेंस, हॉरर असे सर्व काही पाहायला मिळणार आहे. नवीन वर्षामध्ये (New Year Releases 2024) तुम्ही याचा आनंद घेऊ शकता.

मेरी ख्रिसमस (Merry Christmas)

हा एक बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. हा चित्रपट श्री राम राघवन दिग्दर्शित करत आहेत. याआधी त्यांनी कल्ट क्लासिक अंधाधुन चे दिग्दर्शन केले होते. मेरी ख्रिसमस देखील एक उत्कृष्ट चित्रपट असणार आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला साऊथ चित्रपटामधील अभिनेता विजय सेतुपति देखील पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर बॉलीवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ देखील या चित्रपटामध्ये काम करत आहे.

लपता लेडीज (Laapataa Ladies)

हा चित्रपट उत्कृष्ट लेखनामुळे सध्या खूप चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये स्पर्श श्रीवास्तव, प्रतिभा सारखे उत्कृष्ट कलाकार पाहायला मिळणार आहे. चित्रपट 1 मार्च रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाची देखील दर्शक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. मोठ्या पडद्यावर हा चित्रपट काय कमाल दाखवेल हे चित्रपट रिलीज झाल्यानंतर समजणार आहे.

The Crew (द क्रू)

या चित्रपटामध्ये तब्बू, करीना कपूर आणि कृती सेनन सारख्या उत्कृष्ट अभिनेत्रींचा भरणा आहे. त्याचबरोबर कपिल शर्मादेखील चित्रपटामध्ये कॅमियो करताना दिसणार आहे. तर दिलजीत दोसांझ हा अभिनेता देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट रिया कपूर आणि एकता कपूर प्रोड्यूस करत आहेत. हा चित्रपट तुम्ही अवश्य पाहायला हवा.

Kalki 2898 AD (कल्की 2898 एडी)

प्रभासच्या या बहुप्रतीक्षित चित्रपटाची सध्या दर्शक खूपच आतुरतने वाट पाहत आहेत. चित्रपटामध्ये प्रभास शिवाय अमिताभ बच्चन, कमल हसन आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेमध्ये आहेत. चित्रपटामध्ये एकापेक्षा एक अ‍ॅक्शन सिन्स पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना टारगेट करण्यासाठी बनवला जात आहे. चित्रपट बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालणार यामध्ये काही शंका नाही.

Pushpa 2: The Rule (पुष्पा 2: द रूल)

अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता याचा दुसऱ्या भागाची दर्शक आतुरतेने वाट पाहत आहेत. माहितीनुसार या चित्रपटाची शुटींग पूर्ण झाली आहे आणि वीएफएक्सवर काम चालू आहे. अल्लू अर्जुन लवकरच या चित्रपटाबाबत महत्वाची अपडेट देईल. चित्रपट मे-जूनमध्ये बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे.

हेही वाचा: Animal OTT Release: ओटीटी वर लवकरच पाहायला मिळणार रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट, या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज