Sachin Tendulkar लहानपणी या बसने करायचा रोज प्रवास, 315 नंबर पाहताच भावूक झाला मास्टर ब्लास्टर, व्हिडीओ व्हायरल

Sachin Tendulkar Travel BEST Bus Number 315: भारतामध्ये क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. क्रिकेट म्हंटले कि सर्वात पहिला सचिन तेंडुलकरचे नाव समोर येते. सचिन तेंडुलकरला मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखले जाते. पण तो काही एका दिवसामध्ये मास्टर झालेला नाही. त्याने यासाठी खूप मेहनत केली आहे. आज सचिन करोडच्या कार्समध्ये फिरतो. पण एक काळ असा होता जेव्हा तो आपल्यासारखेच बसने प्रवास करायचा.

त्याच आठवणीमध्ये सचिन आज रमला आहे. सचिन क्रिकेट खेळण्यासाठी दररोज बांद्रा ते शिवाजी पार्क बसने प्रवास करत होता. त्याच्या 315 नंबरच्या बसने तो आज पुन्हा एकदा जाऊन बाला. या बसमधून त्याने आपल्या बालपणीच्या आठवणी शेयर केल्या. चला तर मग पाहूयात मास्टर ब्लास्टरचा व्हायरल व्हिडीओ.

Sachin Tendulkar share 315 number bus video viral

सचिन म्हणाला कि, आज खूप वर्षांनंतर 315 नंबरची बस पाहिली, बस पाहताच मला माझे बालपण आठवले. मी दररोज बांद्रा कलानगर ते दादर शिवाजी पार्क याच बसनं प्रवास करत होती. कधी एकदा बस पकडतो आणि मैदानात उतरून क्रिकेट खेळतो अस व्हायचं. आणि संध्याकाळी क्रिकेट खेळून झाल्यानंतर बसच्या शेवटच्या सीटवर बसून खिडकीमधून थंड वाऱ्याचा आनंद घ्यायचो.

सचिनचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाला आहे. 3 करोडपेक्षा जास्त लोकानी हा व्हिडीओ पाहिला आहे तर अनेक लोकांनी त्याचे कौतुक केले आहे. शिवाय जे लोक या बसने प्रवास करत होते त्यांनी देखील आपला अनुभव शेयर केला आहे.

हेही वाचा: आलिया-रणबीरची चाहत्यांना स्पेशल भेट, ख्रिसमसचे औचित्य साधत दाखवला लेकीचा चेहरा, व्हिडीओ व्हायरल