OnePlus Nord Watch वर मिळत आहे बंपर डिस्काऊंट, तब्बल ३००० रुपयांची सरळ सूट

OnePlus Nord Watch: टेक ब्रँड OnePlus जवळ फक्त स्मार्टफोनच नाही तर स्मार्ट टीव्ही आणि वियरेबल्सचा देखील मोठा पोर्टफोलियो आहे. कंपनीची अफॉर्डेबल स्मार्टवॉच OnePlus Nord Watch ला देखील युजर्स चांगला प्रतिसाद डेट आहे. हि वॉच एडवांस फीचर्स सोबत येते. या हि वॉच 3,000 रुपयांमध्ये सवलतीत खरेदी करण्याची संधी दिली जात आहे.

OnePlus Nord Watch कंपनीच्या वेबसाईटवरून जवळ जवळ 40% फ्लॅट डिस्काउंटवर खरेदी केले जाऊ शकते. कमी किंमत असून देखील OnePlus स्मार्टवॉचमध्ये एक मोठा AMOLED डिस्प्ले आणि भरपूर हेल्थ फीचर्स दिले गेले आहेत. हि स्मार्टवॉच डझनभर फिटनेस मोड्स सपोर्टसोबत येते. तसेच स्मार्टफोनसोबत हि सहजपणे कनेक्ट केली जाऊ शकते.

OnePlus Nord Watch

स्वस्तामध्ये खरेदी करा OnePlus Nord Watch

लॉन्चच्या वेळी Nord Watch ची मूळ किंमत 6,999 रुपये इतकी होती पण आता फ्लॅट डिस्काऊंटवर हि वॉच 3,999 रुपयांना खरेदी करता येऊ शकते. इतकेच नाही, जर ग्राहकांनी ICICI बँक क्रेडिट कार्ड किंवा ICICI बँक नेटबँकिंगद्वारे पेमेंट केले तर त्यांना 500 रुपयांचा इंस्टंट डिस्काऊंट मिळतो. हि वॉच मिडनाइट ब्लॅक किंवा डीप ब्लू कलरमध्ये खरेदी करू शकता.

OnePlus Nord Watch चे फीचर्स

अफॉर्डेबल वनप्लस स्मार्टवॉचमध्ये 1.78 इंचचा स्क्वेअर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याची 500nits ची पीक ब्राइटनेस आणि 368×448 पिक्सेल रिझोल्यूशन आहे. 60Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्लेसोबत स्मूथ आणि क्लियर विजुअल एक्सपीरियंस मिळतो. याला N Health मोबाइल ऐप सोबत कनेक्ट केले जाऊ शकते आणि 105 पेक्षा जास्त फिटनेस मोड आहेत.

OnePlus Nord Watch

कंपनीच्या म्हणण्यानुसार हि वॉच पूर्ण चार्ज केल्यास 30 दिवसांपर्यंत स्टँड-बाय टाइम आणि 10 दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ मिळू शकते. IP68 रेटिंगवाल्या या वियरेबल SpO2 ब्लड ऑक्सीजन लेवल मॉनीटरिंग शिवाय अतिरिक्त हार्ट दर आणि स्लीप ट्रॅकिंग सारखे अनेक फीचर्स मिळतात आणि स्मार्ट नोटिफिकेशंसचा सपोर्ट देखील मिळतो. या वॉचमध्ये म्युझिक प्लेबॅक आणि कॅमेरा कंट्रोल्सही देण्यात आले आहेत.

Also Read

==> Apple Watch Ultra सारखे स्मार्टवॉच खरेदी करा फक्त 2000 मध्ये, घरबसल्या करा ऑनलाईन ऑर्डर

Leave a comment