Parineeti Chopra: लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांनंतर परिणीती चोप्राने दिली गुडन्यूज, म्हणाली; ‘मी आता लवकरच…’

Parineeti Chopra To Start Her Music Career: परिणीती चोप्रा बॉलीवूड इंडस्ट्रीमधील चर्चित अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीचे आपल्या दमदार अभिनयामुळे नेहमी कौतुक झाले आहे. परिणीतीने फक्त आपल्या अभिनयाचेच प्रदर्शन केलेलं नाही तर अनेक चित्रपटांमधील गाण्यांना तिने आपला आवाज देऊन आपल्या गायनाचे कौशल्य देखील दाखवले आहे. नुकतेच प्ररीनिती चोप्रा संबंधी एक अपडेट समोर आली आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री आता गायन क्षेत्रामध्ये उतरणार आहे.

Parineeti Chopra

संगीत क्षेत्रामध्ये पाऊल ठेवणार Parineeti Chopra

परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) संगीत क्षेत्रामध्ये उतरण्यास सज्ज झाली आहे. माहितीनुसार अभिनेत्री एंटरटेनमेंट कन्सल्टंट्स LLP सोबत साईनअप करून आपले गायन कौशल्य लाईव मंचावर घेऊन जाण्यांसाठी सज्ज झाली आहे. असे म्हंटले जात आहे कि टीएम व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि टीएम टॅलेंट मॅनेजमेंटचा हा एक भाग आहे. जे देशातील प्रसिद्ध संगीतकारांचे प्रतिनिधित्व करतात. यामध्ये अरिजित सिंग, सुनिधी चौहान, बादशाह, अमित त्रिवेदी यांच्यासह २५ हून अधिक कलाकारांच्या नावांचा समावेश आहे.

या चित्रपटांमधील गाण्यांना दिला आवाज

परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) 2017 मध्ये ‘मेरी प्यारी बिंदु’ चित्रपटामधील ‘माना के हम यार नहीं’ या गाण्याला आवाज दिला होता. शिवाय अभिनेत्रीने 2019 मध्ये आलेल्या केसरी चित्रपटामधील ‘तेरी मिट्टी’ हे देशभक्तीपर गाणे गाऊन तिच्या आवाजाची जादू सर्वदूर पसरवली. तर 2021 मधील ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ चित्रपटामधील ‘मतलबी यारियां’ हे गाणे तिने गायले होते. अभिनेत्रीने लग्नाच्या दिवशी तिचा पती राघव चड्ढा ला ‘ओ पिया’ हे गाणे डेडिकेट केले होते, जे ऐकल्यानंतर प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. परिणीतीचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर खूप व्हायरल झाला होता.

वर्क फ्रंट

परिणीतीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर ती अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन ईरानी सोबत ‘ऊंचाई’ चित्रपटामध्ये शेवटी पाहायला मिळाली होती. शिवाय ती ‘मिशन रानीगंज: द ग्रेट इंडियन रेस्क्यू’ चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेयर करताना दिसली होती. तर अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती ‘अमर सिंह चमकीला’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत दिलजीत दोसांझ देखील दिसणार आहे. हा चित्रपट पंजाबच्या एका प्रसिद्ध गायकाच्या जीवनावर आधारित आहे.

हेही वाचा: सलमान खानने पूर्ण केले 9 वर्षाच्या चिमुकल्या चाहत्याचे स्वप्न, पहिल्या भेटीमध्ये भाईजानने दिले होते ‘हे’ वचन