रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरच्या फोटोंमुळे चर्चांना एकच उधाण; नेटकरी म्हणाले, “आता दोघे…” | Rinku Rajguru and Akash Thosar

Rinku Rajguru and Akash Thosar: नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटामधून रिंकू राजगुरू आणि आकाश यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. 29 एप्रिल 2016 रोजी सैराट चित्रपट रिलीज झाला होता. ज्यानंतर हे दोघे रातोरात फेमस झाले होते. चित्रपटाला दर्शकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. चित्रपटामध्ये आर्चीची भूमिका रिंकूने तर परश्याची भूमिका आकाश ठोसरने साकारली होती.

आता चित्रपटाला बराच काळ लोटला आहे. पण तरीदेखील रिंकू-आकाशची जोडी पाहिल्यानंतर चाहत्यांना सैराट चित्रपटाची आठवण येते. चित्रपटामधील दोघांची स्टोरी हृदयाला भिडणारी होती. दरम्यान दोघे आता पुन्हा एकदा एकत्र आलेले पाहायला मिळाले. दोघांचे फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. दोघांच्या फोटोंवर (Rinku Rajguru and Akash Thosar) चाहत्यांनी देखील भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी नुकतेच इरा खानच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली होती. यावेळी आकाश काळ्या शेरवानीमध्ये पाहायला मिळाला तर रिंकूने जांभळ्या कलरची साडी घातली होती. दोघांच्या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या सोहळ्यामधील दोघांचे फोटो (Rinku Rajguru and Akash Thosar) सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

फोटो व्हायरल (Rinku Rajguru and Akash Thosar)

रिंकू आणि आकाशने शेयर केलेल्या फोटोंवर सध्या चाहत्यांनी अनेक कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी तर दोघांनी “आता लवकरच लग्न करा” अश्या कमेंट केल्या आहेत. तर एका युजरने “अर्ची आणि परश्याची जोडी एक नंबर आहे” अशी कमेंट केली आहे. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर आता चर्चांना उधान आले आहे. पण रिंकू-आकाशने यावर आपली कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी आस्क मी सेशनमध्ये रिंकूने देखील सिंगल असल्याचे जाहीर केले होते.

हेही वाचा: ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्रीचं ‘बोल्ड फोटोशूट’, सोशल मिडियावर फोटो व्हायरल, पहा फोटोज