Sai Tamhankar: सई ताम्हणकरला हवा आहे असा जोडीदार, म्हणाली; “त्याच्यासोबत मला…”

Sai Tamhankar: सई ताम्हणकर (Sai Tamhankar) मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या बळावर सईने चाहत्यांच्या मनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मिडियावर सईचा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या चाहत्यांसोबत ती फोटो आणि व्हिडीओ शेयर करून नेहमी संपर्कात राहते. प्रोफेशनल लाईफसोबत अभिनेत्री पर्सनल लाईफमुळे देखील नेहमी चर्चेमध्ये राहते. दरम्यान एका मुलाखतीदरम्यान तिने तिच्या जोडीदाराबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Sai Tamhankar ने जोडीदाराबद्दल केले भाष्य

सईने मुलाखतीदरम्यान तिला नेमका कसा जोडीदार हवा आहे याबद्दल भाष्य केले आहे. सई म्हणाली कि, मला असा जोडीदार हवा आहे ज्याच्यासोबत मी काहीही बोलू शकेन. अनेकवेळा मुलं मुली आपल्या जोडीदारासोबत खूप वेगळ वागतात आणि त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत वेगळ वागतात. मला असा जोडीदार हवा आहे ज्याच्यासोबत मी 60 वर्षे जगले तरी नवनवीन गुण समोर आले पाहिजेत.

सई पुढे म्हणाली, “दोघांनी देखील नात्यामधील स्पेसला तेवढेच महत्व दिले पाहिजे. यामुळे तुमच्या लाईफमध्ये उत्सुकता ओढ तशीच राहते. ती व्यक्ती माझ्या आयुशाय्म्ध्ये येण्याअगोदर माझे एक वेगळे जग होते, ते जग तसेच कायम राहिले पाहिजे. तसेच त्याचेही जग कायम राहिले पाहिजे.”

सईने 2013 मध्ये अमेय गोसावीबरोबर लग्न केले होते. अमेय हा एक चित्रपट निर्माता आहे. तो लोडिंग पिक्चर्स नावाची त्याची निर्मिती संस्थेचा मालक आहे. लग्नाच्या अगोदर सई व अमेयने एकमेकांना तीन वर्षे डेट केले होते ज्यानंतर त्यांनी लग्न केले होते. 2012 मध्ये त्यांनी गुपचूप साखरपुडा केल्याचे सांगण्यात येते. पण दोघांचे नाते फार काळ टिकले नाही. लग्नाच्या अवघ्या दोन वर्षामध्ये दोघे 2015 मध्ये दोघे घटस्फोट घेऊन वेगळे झाले. सईने (Sai Tamhankar) आपल्या खांद्यावर एक टॅटू काढला आहे ज्यामध्ये दोन तारखा आहेत. एक म्हणजे त्यांच्या लग्नाची तारीख आणि दुसरी तारीख अमेयने प्रपोज केलेल्या दिवसाची आहे.

हेही वाचा: अक्षया देवधरचे वयाच्या 9 व्या वर्षांपासून ते 45 वर्षांपर्यंतच्या मुलींना महिलांना आवाहन, म्हणाली; ‘कॅन्सर होऊ नये म्हणून…’