Rinku Rajguru Boyfriend: “तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव काय आहे?” चाहत्याच्या प्रश्नावर ‘सैराट’ फेम रिंकूनं दिलं असं उत्तर, म्हणाली…

Rinku Rajguru Boyfriend: रिंकू राजगुरू हे नाव अख्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणाला माहिती नसेल असा एकही व्यक्ती मिळणार नाही. 2016 मध्ये रिलीज झालेल्या सैराट चित्रपटामधून रिंकू रातोरात स्टार झाली होती. त्यानंतर ती हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा 2 चित्रपटामध्ये देखील दिली होती. अभिनेत्री सोशल मिडियावर देखील खूपच सक्रीय असते. रिंकूच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी आतुर असतात.

रिंकू राजगुरू बॉयफ्रेंड (Rinku Rajguru Boyfriend)

नुकतेच रिंकूने नवीन वर्षाच्या निमित्ताने इंस्टाग्रामवर आस्क मी सेशन घेतलं होतं. ज्यामध्ये तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. रिंकूला यादरम्यान चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले पण एका प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. “तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव काय आहे?” (Rinku Rajguru Boyfriend) असा प्रश्न चाहत्याने रिंकूला विचारला. यावर ती उत्तर देत म्हणाली कि, “बॉयफ्रेंड नाही…नावही नाही..” यामुळे अभिनेत्रीच्या रिलेशनच्या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे.

Rinku Rajguru Boyfriend

यानंतर रिंकूला आणखी एका चाहत्याने “तू तेलुगू चित्रपटात केव्हा काम करणार?” असा प्रश्न विचारला, यावर ती उत्तर देत म्हणाली कि, “मला तेलगु चित्रपटामध्ये कम करण्याची इच्छा आहे हि संधी लवकरच मिळेल अशी आशा आहे. रिंकूने नुकतेच तिच्या आगामी चित्रपटाबद्दल चाहत्यांना माहिती दिली होती. तिचा आशा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे,

चित्रपटामधील लुकचा एक फोटो अभिनेत्रीने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केला होता. फोटोमध्ये रिंकू हिरवी साडी, गळ्यामध्ये मंगळसूत्र अशा लुकमध्ये पाहायला मिळाली होती. त्याचबरोबर ती खिल्लार चित्रपटामध्ये पाहायला मिळाली आहे. चित्रपटामध्ये अभिनेता ललित प्रभाकरसोबत ती मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे.

Rinku Rajguru Boyfriend

दरम्यान इंस्टाग्रामवर आस्क मी सेशन दरम्यान अभिनेत्रीने दिलखुलास उत्तरे दिली. एका चाहत्याने तिला तिचे टोपणनाव विचारले यावर तिने आपल्या खऱ्या नावाचा देखील खुलासा केला. अभिनेत्रीचं रिंकू हे टोपणनाव आहे तर तिचे खरे नाव प्रेरणा राजगुरू आहे.

हेही वाचा: ‘भागो मोहन प्यारे’ फेम अभिनेत्रीने दिली चाहत्यांना ‘गुड न्यूज’, नवीन वर्षाच्या दिवशी झालं गोंडस पाहुण्याचं आगमन